अंगणवाडी सेविकांचे कामकाज होणार ‘स्मार्ट’

अंगणवाडी सेविकांचे कामकाज होणार ‘स्मार्ट’
अंगणवाडी सेविकांचे कामकाज होणार ‘स्मार्ट’

नाशिक : अंगणवाडी सेविका पारंपरिक पद्धतीने सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजनांच्या नोंदी, लसीकरण यांसह दैनंदिन कामकाजाचा आढावा लिखित स्वरूपात ठेवण्यात येतो. या सर्व कामाचा अहवाल अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागतो. मात्र, यावर आता मात करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन दिला जाणार असून, त्याद्वारे सर्व दैनंदिन नोंदी व कामाचा आढावा ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. 

याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत माहिती अद्ययावत करून मोबाईलवर भरण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन या वेळी करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात या पद्धतीचा वापर करून जबाबदारीने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने याबाबत मोबाईल ॲप विकसित केले आहे. या अपद्वारे सर्व कामे ऑनलाइन करता येणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी दुर्गम भाग,  अवघड रस्ते व वाहतुकीची अडचण असल्याने अहवाल वेळेत सदर करण्यात अडचण येत असते. त्यासाठी वेळेत सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोठी कसरत करावी लागते. मात्र, या स्मार्टफोनच्या साह्याने विकसित केलेल्या ॲपद्वारे काम सहज व वेळेत होणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार असून याबाबतची माहिती तालुका ते राज्यस्तरापर्यंत पाहता येणार आहे.

पुढील आठवड्यात अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध होणार आहेत. त्यांनतर पुन्हा २ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान शासनाकडून याबबत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी दिली. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व बालविकास अधिकारी, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com