खानदेशात शेतरस्त्यांची कामे अर्धवट

खानदेशात शेतरस्त्यांची कामे अर्धवट
खानदेशात शेतरस्त्यांची कामे अर्धवट

जळगाव : खानदेशात पाणंद रस्ते योजनेतील शेतरस्त्यांची कामे कासवगतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यांचे खडीकरण, दबाईचे काम झाले नसल्याची स्थिती आहे.

यासंदर्भात सर्वत्र निधी प्रांत स्तरावर उपलब्ध झाला आहे. ग्रामस्तरीय समित्यांनी दिलेल्या शिफारशींनुसार ही कामे प्रांत कार्यालयाने मंजूर केली. कामांना मंजुऱ्या मिळाल्या. लागलीच कंत्राटदारांनी काम हाती घेतले. रस्ताची हद्द ठरवून नंतर जेसीबीच्या साह्याने दोन्ही बाजूला पाणी वाहून नेणारे मार्ग तयार केले. रस्त्यावर माती पसरविण्यात आली.

रस्त्याचे खडिकरण करणे अपेक्षित होते. परंतु ते महिनाभरापासून झाले नाही. रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यावर मातीच-माती आहे. त्यावरून दुचाकी व्यवस्थितपणे जाऊ शकत नाही. पाऊस आला तर रस्ते चिखलमय होतील. जळगाव, धुळे, शिरपूर, चोपडा, शहादा भागात अशीच अवस्था आहे.

जळगाव तालुक्‍यातील एक रस्ता मागील दीड महिन्यांपासून खडिकरण, दबाईच्या प्रतीक्षेत आहे. परंतु कामासाठी गांभीर्याने कार्यवाही केली जात नसल्याचे ग्रामस्थ, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासन निवडणुकीच्या गडबडीत आहे. दुसरीकडे निधी प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. मग कंत्राटदारांनी कामे प्रलंबित ठेवली का, असा प्रश्‍न ग्रामस्थ करीत आहेत.

ग्रामस्तरीय समितीमध्ये सरपंच, पोलिस पाटील आदी आहेत. या मंडळीला शेतकरी रस्त्यांच्या अर्धवट कामांबाबत जाब विचारत आहेत. काही ग्रामस्थ या संदर्भात प्रशासनाची भेट घेण्याची तयारी करीत आहेत. निवडणुका सुरू असल्याने यावरून राजकारणदेखील होऊ शकते, असेही सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com