agriculture news in Marathi work of cane research center in Jalna on progress Maharashtra | Page 2 ||| Agrowon

जालन्यातील ऊस संशोधन केंद्र उभारणीला सुरुवात  

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जून 2021

ऊस शेतीच्या विकासासाठी विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या ऊस संशोधन केंद्राच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. 

पुणे ः ऊस शेतीच्या विकासासाठी विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या ऊस संशोधन केंद्राच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. या कामांचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) बैठकीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वतः आढावा घेतला.  

जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे पाथरवाला गावाच्या शिवारात ‘व्हीएसआय’कडून संशोधन केंद्र उभारले जात आहे. राज्याच्या ऊस संशोधनाच्या वाटचालीत पाडेगाव व मांजरी बुद्रुक या दोन भागांचा वाटा मोठा आहे. मात्र विदर्भ आणि मराठवाड्याला डोळ्यासमोर ठेवून स्वतंत्र संशोधन केंद्र होण्यासाठी श्री. पवार यांचा पाठपुरावा सुरू होता. केंद्रासाठी सरकारी जागा मिळण्याचा ‘व्हीएसआय’चा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर केल्यानंतर २२ फेब्रुवारी १२८ एकर जागा ‘व्हीएसआय’कडे वर्ग करण्यात आली.  

जालन्याच्या या केंद्रावर आता १३ एकरवर ऊस लागवडदेखील करण्यात आली आहे. ‘व्हीएसआय’च्या त्रैमासिक बैठकीत मंगळवारी (ता. १५) याबाबत माहिती देण्यात आली. साखर कारखान्यांच्या ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांची स्थिती देखील श्री. पवार यांनी समजून घेतली. या वेळी चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, ‘व्हीएसआय’चे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, महासंचालक शिवाजीराव देशमुख, साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.  

 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...