agriculture news in Marathi work of Certification system on Maharashtra | Page 2 ||| Agrowon

बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेचा कारभार प्रभारींवरच

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

‘शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे म्हटले जाते. परंतु राज्यात बियाणे प्रमाणीकरणासाठी असलेली यंत्रणाच शासनाने दुर्लक्षीत ठेवली असून प्रभारींच्या माध्यमातूनच या यंत्रणेचा गाडा हाकला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.

नागपूर ः ‘शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे म्हटले जाते. परंतु राज्यात बियाणे प्रमाणीकरणासाठी असलेली यंत्रणाच शासनाने दुर्लक्षीत ठेवली असून प्रभारींच्या माध्यमातूनच या यंत्रणेचा गाडा हाकला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शुद्ध बियाणे मिळण्याचा उद्देशच दुर्लक्षीत राहिला आहे.

राज्यात यावर्षी सोयाबीन बियाणे उगवण विषयक तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात तक्रारींचा आकडा तीस हजारावर पोचला आहे. त्यामुळे बियाणे उत्पादकांसोबतच बियाणे प्रमाणीकरणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या यंत्रणेच्या भूमिकेवरची शंका व्यक्त होऊ लागली आहे.

राज्यात गेल्या हंगामात सोयाबीन काढणीच्यावेळी झालेल्या पावसामुळे बीजोत्पादन क्षेत्रालाही फटका बसला. त्यामुळे उगवण क्षमता ७० टक्के अपेक्षीत धरण्याऐवजी ती ६५ टक्के गृहीत धरण्याचे निर्देश शासनाकडून प्रमाणीकरण यंत्रणांना देण्यात आले. त्यामुळे राज्यात प्रमाणित बियाण्यांची उपलब्धता काही अंशी वाढली. }

सत्यतादर्शक (ट्रुथफुल) बियाण्यांवर कंपन्यांचे लेबल राहते. गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या परवान्यात तरतूद असेल तरच असे बियाणे तयार करुन विकता येते. याची जबाबदारी उत्पादक कंपनीवर राहते. मूलभूत बियाणे (ब्रिडर सिड) विद्यापीठाकडून घेऊन त्यापासून पायाभूत बियाणे तयार होते. ते शेतकऱ्यांना बीजोत्पादनाकरिता दिले जाते. त्यापासून प्रमाणित बियाणे मिळते. परंतु बियाणे प्रमाणीकरणाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेचा कारभार अनेक वर्षांपासून प्रभारींच्या भरवशावर असल्याने बियाणेविषयक धोरणाबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

गेल्या वीस वर्षांत २२ संचालकांची नियुक्ती प्रमाणीकरण यंत्रणेवर झाली. त्यातील १२ संचालक हे प्रभारी होते तर अवघे १० संचालकच पूर्णवेळ होते. साईडपोस्ट म्हणून संचालक पदाची जबाबदारी घेण्यास कोणीच तयार नसल्याचे वास्तव यामागे सांगितले जाते. सध्याही अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्याकडे या पदाची अतिरिक्त जबाबदारी आहे.

प्रतिक्रिया
राज्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्तपदे आहेत. त्यामुळे प्रमाणीकरण यंत्रणेत आजवर अपवाद वगळता पूर्णवेळ संचालक नियुक्त करणे शक्य झाले नाही. बियाण्यांचा दर्जा राखण्यात बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेची मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी लक्षात घेता संस्थेवर पूर्णवेळ संचालक देण्याचा प्रयत्न केला जाईल.
- दादा भुसे, कृषिमंत्री

७० टक्के उगवणक्षमता तपासण्याचा निकष असताना ४९ पैकी १६ आणि त्यानंतर ६५ टक्के उगवणक्षमता गृहीत धरण्याचे आदेश आल्यानंतर केवळ दोन नमुने पास आले. त्यावरुनच प्रमाणीकरणाचे काम जबाबदारीने होते हे सिद्ध होते. परिणामी प्रमाणीकरणाच्या कामाविषयी शंका व्यक्त करणे सयुक्तिक वाटत नाही. 
- विलास गायकवाड, बाळनाथ शेतकरी उत्पादक कंपनी, बाळखेड,  रिसोड, वाशीम


इतर अॅग्रो विशेष
साखर उद्योगाकडून २५ ऑक्सिजन प्रकल्पपुणेः कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या भयावह साथीचा...
गुरुवारपासून पाऊस वाढणार पुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात गेल्या...
दोन हजार कोटींचा बेदाणा शीतगृहात पडून सांगली ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सांगली-...
दर्जेदार आंब्याला मिळवले बांधावरच ग्राहकपुनर्वसित ठिकाणी मिळालेल्या शेतजमिनी ओसाड...
नगरमध्ये भाजीपाला विक्रीला बंदी नगर ः कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या...
देशमुख बंधूंकडून उन्हाळ्यात जनावरांना...बुलडाणाः शेतकऱ्यांची दानशूरता, दिलदारपणा आजवर...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...
तुरळक ठिकाणी हलक्या सरी पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणात दोन...
ढगाळ वातावरणाचा इशारा पुणे : राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. आज...
मध्य प्रदेशच्या बियाणे एकाधिकारशाहीला...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीसाठी अचानक...
कापूस लागवड वाढीची शक्यता नागपूर ः गेल्या हंगामात सोयाबीन उत्पादकांना...
‘ब्रॉयलर’मधील तेजी टिकून नगर ः कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती...
कोरोनाला हरवायला हवी दुर्दम्य इच्छाशक्तीकोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशातील जनता...
मराठवाडा, विदर्भात पाऊस वाढण्याची...पुणे : दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या परिसरात...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखर तेजीत कोल्हापूर : जगातील महत्त्वाच्या साखर पुरवठादार...
शेतकऱ्यांना कोट्यवधीचा रोज फटका पुणे ः कोरोनाने सर्वत्र उडालेला हाहाकार आणि...
वादळी पावसाने नुकसान पुणे : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पूर्वमोसमी...
शेतकऱ्यांनी आता स्ववलंबी व्हावेकृषी विविधता भरपूर असलेला महाराष्ट्र आज एकसष्ट...
राज्यात ठिकठिकाणी पावसाने झोडपले पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील...
सोयाबीनच्या २१ वाणांची राज्यासाठी...परभणी ः देशातील कृषी विद्यापीठे तसेच विविध संशोधन...