Agriculture news in marathi Work on the 'Corona' Investigation Laboratory in Nashik in the final phase | Agrowon

नाशिक येथे ‘कोरोना’ तपासणी प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 एप्रिल 2020

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सुरू होणाऱ्या ‘कोरोना’ तपासणी प्रयोगशाळेची पाहणी शनिवारी (ता. १८) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर व ‘मविप्र’च्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार व उपजिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी केली असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी दिली. 

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सुरू होणाऱ्या ‘कोरोना’ तपासणी प्रयोगशाळेची पाहणी शनिवारी (ता. १८) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर व ‘मविप्र’च्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार व उपजिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी केली असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी दिली. 

जिल्ह्यात ‘कोरोना’ रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथे तपासणी प्रयोगशाळेची मागणी होती. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या होत्या. 
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे मदत करण्याबाबत सूचविले होते. त्यानुसार श्री. देशमुख यांनी विद्यापीठाला सूचना केली होती. त्यामुळे सरकारने वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणी प्रयोगशाळेचा निर्णय घेतला असताना आता विद्यापीठाचे सहकार्य मिळणार आहे. 

सध्या प्रयोगशाळा उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून प्रयोगशाळा यंत्र सामुग्री व कामकाजाची माहिती डॉ. दिलीप म्हैसेकर, श्रीमती नीलिमाताई पवार, उपजिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, शिक्षणाधिकारी डॉ. नानासाहेब पाटील यांनी घेतली. 

यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. नीता गांगुर्डे व दातार लॅबचे संचालक यांनी यंत्रसामुग्रीची माहिती दिली. कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांनी युध्दपातळीवरील सुरू असलेल्या उभारणीच्या कामाचे समाधान व्यक्त केले. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...