agriculture news in Marathi work of corp insurance will start form June Maharashtra | Agrowon

पीकविम्याचे कामकाज या महिन्यात

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 जून 2020

 राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया या (जून) महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. 

‘‘शेतकऱ्यांना वीमा सुविधा देणाऱ्या वीमा कंपन्या प्रथम निविदा भरतात. या निविदा मंजूर झाल्यानंतर राज्य शासनाने करार करते. सध्या निविदा प्रक्रियेचे काम सुरू आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना बँकेत वीमा हप्ता भरण्याची प्रक्रिया जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

कृषी आयुक्तालयाच्या सांख्यिकी विभागाकडून पीकविमा योजनेच्या अटीशर्ती ठरविल्या जातात. मुख्य सांख्यिक उदय देशमुख यांच्याकडून या प्रक्रियेवर लवकरच अंतिम काम केले जाईल. त्यानंतर कृषी आयुक्त सुहास दिवसे व कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या कडून कामकाजाचा आढावा घेतला जाईल.

‘‘वीमा कंपन्यांसोबत अंतिम करारनाम्यावर मुख्य सांख्यिक देशमुख व कृषी विस्तार संचालक नारायण शिसोदे यांच्या स्वाक्षऱ्या होतील,’’ अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

दरम्यान, वीमा योजना आता ऐच्छिक राहील. त्यामुळे राज्य शासनाला यंदाच्या खरिपापासून नियमावलीत विविध बदल करावे लागणार आहेत. योजनेत सहभागी होणास इच्छुक नसल्याबद्दल शेतकऱ्याला आता घोषणापत्र देण्याची सुविधा मिळणार आहे. नोंदणीच्या आठवडाभर आधी तसे घोषणापत्र घ्यावे, असे आदेश केंद्राने दिले आहेत. 

केंद्राने बँकांना यंदा काही सूचना देत तंबी दिली आहे. कृषी आयुक्तालयाच्या सांख्यिकी विभागाने मात्र बॅंकासाठी यंदा काहीही नवीन सूचना नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘‘योजनेत सहभाग नसल्यास संबंधित शेतकऱ्याला फक्त घोषणापत्र बॅंकेत द्यावे लागेल. बाकी योजनेत काहीच बदल झालेला नाही,’’ असे मुख्य सांख्यिक श्री. देशमुख यांनी सांगितले. 

पाच जिल्ह्यांची समस्या सुटली 
पंतप्रधान पीकविमा योजनेतील विविध राज्यातील शेतकऱ्यांनी लॉकडाउनच्या काळात दाखल केलेले दावे फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्सतर्फे मान्य करण्यात आले. एकूण २७६ कोटींचे दावे मंजूर झाले असून त्यात अहमदनगर, बुलढाणा, नांदेड, सातारा, आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील २८ हजार ५९७ शेतकऱ्यांना २३ कोटी ९६ लाख रुपये देण्यात आले आहेत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.


इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...