शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे ः लोणीकर

शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे
शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे

परभणी ः कमी पावसामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमध्ये प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींनी जनता तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषद अध्यक्ष उज्‍ज्वला राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आदी उपस्थित होते.

श्री. लोणीकर म्हणाले, राज्यातील टंचाई स्थितींची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येईल. पण सद्यस्थितीमध्ये पाणी, चारा, जनावरांसाठी पाणी मिळण्यास प्राधान्य दिले जावे. केंद्र शासनाने उपगृहाद्वारेदेखील परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शासनाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यासाठी पीक कापणी प्रयोग तसेच प्रत्यक्ष पाहणी महत्त्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने कृषी सहायक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे.

दरम्यान श्री. लोणीकर यांनी गणेशपूर (ता. जिंतूर) तळतुंबा (ता. सेलू), परभणी तालुक्यातील गावांना भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com