साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा देण्याचे काम ः अशोक चव्हाण

साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची वैचारिक बैठक घडवण्याचे व दिशा देण्याचे कार्य साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत असते, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
The work of giving ideological direction through Sahitya Sammelan: Ashok Chavan
The work of giving ideological direction through Sahitya Sammelan: Ashok Chavan

औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची  वैचारिक बैठक घडवण्याचे व दिशा देण्याचे कार्य साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत असते, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषद आणि लोकसंवाद फाउंडेशन आयोजित ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी मंचावर मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबू बिरादार, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, आमदार सतीश चव्हाण, मधुकर अण्णा मुळे, के. एस. अतकरे, मावळते संमेलन अध्यक्ष ऋषिकेश कांबळे, साहित्यिक दादा गोरे यांच्यासह मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.

प्रास्ताविकात कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्य आणि मागण्या, संमेलन आयोजनामागची भूमिका व्यक्त केली. मावळते अध्यक्ष ऋषिकेश कांबळे यांनी साहित्यात मराठवाड्याचे योगदान, साहित्य चळवळ आणि साहित्यातील बदलते स्वरूप याविषयी मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात बाबू बिरादार यांनी आपली साहित्यिक जडणघडण व साहित्याची निर्मिती याविषयी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com