जामफळ धरणाचे काम खोळंबले

सोनगीर, जि. धुळे ः तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ व कनोली प्रकल्प भरून घेणाऱ्या योजनेचे काम कोरोना काळातही वेगात सुरू होते. आता अनलॉक असताना काम बंद पडले आहे.
 Work on the Jamphal dam was delayed
Work on the Jamphal dam was delayed

सोनगीर, जि. धुळे  ः तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ व कनोली प्रकल्प भरून घेणाऱ्या योजनेचे काम कोरोना काळातही वेगात सुरू होते. आता अनलॉक असताना काम बंद पडले आहे. मुरुम, काळी माती नसल्याने व शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागेल.

सध्या मूळ धरण ८५ टक्के भरले आहे. कामात पाण्याचा अडथळा येत होता, म्हणून पाच सेमीपर्यंत पाण्याची पातळी कमी करण्यासाठी पाटचारीतून पाणी सोडण्यात आले होते. दरम्यान, धरणात दहा लक्ष घनफूटाचे सहा मोठे खड्डे खोदण्यात आले. धरणालगत भव्य बांध तयार करण्याचे काम थांबले आहे. केवळ हेड रेग्यूलेटरचे (पाटचारी) काम सुरू आहे. तापी ते जामफळ धरणापर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी पाया तयार करण्याचे कामही खोळंबले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनामुळे भितीचे वातावरण असतानाही २२ ऑगस्टपर्यंत काम सुरू होते. मात्र धरणग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला न मिळाल्याने शेती अधिग्रहणाअभावी धरणाचे उत्तरेकडील काम बंद पडले. शिवाय काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला असला तरी त्यांनी पेरणी केली आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान करता येत नाही. धरणातून पाण्याचा निचरा होऊ नये म्हणून बांध बांधताना काळ्या मातीचा उपयोग केला जातो. मात्र, शेतातून काळी माती काढता येत नाही. परिणामी, मुरुमही मिळत नाही. शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याची प्रक्रिया कोरोनामुळे मध्येच बंद पडली आहे.

जामफळ कनोली प्रकल्प मंजूर होऊन निधी येऊन पडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे मोजमापही झाले. धरणाचे काम वेगात होण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला देऊन शेती ताब्यात घेऊन काम सुरू करणे आवश्यक आहे. त्यात दिरंगाई का असा प्रश्न आहे. या योजनेमुळे धुळे व शिंदखेडा तालुक्यातील प्रथम प्रत्येकी ५०० व पुढे आणखी शंभर अशी दोनशे गावे सिंचनाखाली येतील.

अनेकजण कामावरून कमी, उपासमार सुरू

धरणातील पात्राचे व बुडीत क्षेत्राच्या आखणीनंतर खोलीकरण, दगडी व काळ्या मातीच्या भिंती उभ्या करणे, सपाटीकरण, चारी खोदकाम, जलवाहिनी बनविणे आदी सुरू असलेली कामे ठप्प पडली आहेत. दरम्यान, डंपर, जेसीबी, पोकलँड प्रकल्प कार्यालयाजवळ उभे आहेत. डंपर चालकांसह अनेकांना कामावरून कमी केले आहे. त्यांची उपासमार सुरू आहे. आता हे काम कधी सुरू होते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com