Agriculture news in Marathi, The work of Mahavitaran should be improved: Gulabrao Patil | Agrowon

महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी ः गुलाबराव पाटील
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी कामात सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठकीत दिला. 

जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी कामात सुधारणा करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठकीत दिला. 

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील विविध कामांची आढावा बैठक येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात राज्यमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, पंचायत समितीचे सदस्य मुकुंद नन्नवरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, ‘महावितरण’ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, विविध गावांचे सरपंच उपस्थित होते. 

राज्यमंत्री पाटील म्हणाले, की जळगाव व धरणगाव या तालुक्‍यांतील विविध गावांमध्ये पेव्हर ब्लॉक, गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सामाजिक सभागृह, अभ्यासिकांची जी कामे मंजूर आहेत, ती तातडीने पूर्ण करावीत. जळगाव तालुक्‍यातील ७७ व धरणगाव तालुक्‍यातील ४९ गावांमध्ये नव्याने सुचविण्यात आलेल्या कामांच्या निविदा पूर्ण करून ती कामे सुरू करावीत. या वेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व हायब्रीड ऍम्युनिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांचाही आढावा घेण्यात आला. जळगाव व धरणगाव या तालुक्‍यांतील जिल्हा परिषदेच्या ताब्यातील ज्या ५२ रस्त्यांचा दर्जोन्नत झाला आहे, त्यांचे हस्तांतरण तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करावे, असे आदेशही राज्यमंत्री यांनी बांधकाम विभागास दिले.

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...