agriculture news in Marathi work of MANREGA start from 20 April Maharashtra | Agrowon

सांगली : मनरेगाची कामे २० एप्रिलनंतर सुरू करा

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 एप्रिल 2020

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची (मनरेगा) कामे २० एप्रिलनंतर सुरू करा, कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगबाबत दक्षता घ्या, कामावर आलेल्या मजुरांना सॅनिटायझर, मास्क, साबण पुरवण्याबाबत ग्रामपंचायतींना सुचना द्या.

सांगली ःमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची (मनरेगा) कामे २० एप्रिलनंतर सुरू करा, कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगबाबत दक्षता घ्या, कामावर आलेल्या मजुरांना सॅनिटायझर, मास्क, साबण पुरवण्याबाबत ग्रामपंचायतींना सुचना द्या, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी गटविकास अधिकारी यांना दिले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ. तानाजी लोखंडे यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे गटविकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. गावस्तरावर ‘मनरेगा’ची कामे सुरू करण्याबाबत निर्देश दिले. 

गावात दवंडी देऊन नमुना नंबर चार मध्ये मागणी घ्यावी. वैयक्तिक कामावर (घरकुल, विहीर, शोषखड्डे...) जास्तीत जास्त भर द्यावा. कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखावे. मजुरांना सॅनिटायझर, साबण, मास्क आदी साहित्य पुरवण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर राहणार आहे. जिल्ह्यात शेतमजूर, ऊस तोडणी कामगार यांना कामे पुरवायची आहेत.

साधारणपणे ३० ते ६० वर्षे वयोगटातील लोकांना प्राधान्याने काम द्यावे. सुरूवातील अपूर्ण कामे पूर्ण करून घेण्याची कार्यवाही करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान एक काम सुरू करण्याची दक्षता घ्यावी. ग्राम रोजगार सेवकांची देयके तत्काळ सादर करावीत, अशा सुचना दिल्या. तालुकानिहाय सेल्फवर असलेल्या कामांची माहितीही राऊत यांनी घेतली. 

मनरेगाची कडेगाव तालुक्यात २५६, मिरज ५६६, आटपाडी ५६३, तासगाव २२४, कवठेमहांकाळ तालुक्यात ११० कामे अपूर्ण आहेत. अपुर्ण कामे पूर्ण करून घेण्याची कार्यवाही प्राधान्याने करावी, अशी सुचनाही राऊत यांनी केली. मजुरांना तपासणीसाठी कामाच्या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भेट होणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...