औरंगाबाद जिल्हयात मागणीनुसार ८ हजारावर मजुरांना काम

औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आतापर्यंत ग्राम पंचायत यंत्रणा व इतर यंत्रणा मिळून जिल्हयात ११४६ कामे सुरू आहेत. ८१५१ मजुरांना मागणी केल्याप्रमाणे काम उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Work for over 8,000 laborers in Aurangabad district as per demand
Work for over 8,000 laborers in Aurangabad district as per demand

औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आतापर्यंत ग्राम पंचायत यंत्रणा व इतर यंत्रणा मिळून जिल्हयात ११४६ कामे सुरू आहेत. ८१५१ मजुरांना मागणी केल्याप्रमाणे काम उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर कामांचा शेल्फ उपलब्ध आहे. मागणी होताच काम उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना करून ठेवण्यात आली आहे. या व्यक्तींनी संबंधित ग्राम पंचायतीमध्ये कामाची मागणी करावी, जेणे करून त्यांना काम उपलब्ध् करून देणे सोईस्कर होईल. तसेच ‘मग्रारोहयो’अंतर्गत काम उपलब्ध असल्याबाबत प्रचार प्रसिध्दी होण्याच्या अनुषंगाने पंचायत समिती व ग्राम पंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागात उपलब्ध शेल्फ (मंजुर कामे) बाबतची माहिती दाखविण्यात आली आहे. ज्या व्यक्तीला कामाची आवश्यकता आहे, त्यांनी ग्राम पंचायतमध्ये मागणी नोंदवावी. कामासाठी इतरत्र स्थलांतरीत होण्याची आवश्यकता नाही. 

ग्राम रोजगार सेवक हा एक महत्वाचा दुवा असून त्यांद्वारे Active Labor’s (मागील दोन वर्षात ज्यांनी काम केले आहे असे मजुर) यांचे सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांना कामांची आवश्यकता आहे, किंवा नाही, याबाबत पडताळणी केली जात आहे. त्याचबरोबार ग्राम पंचायत स्तरावर काम उपलब्ध असल्याबाबत प्रचार प्रसिध्दीही करण्यात येत आहे. मजुरांना शारीरिक अंतर ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. कामाच्या ठिकाणी मास्कचे वाटप करण्यात येत आहे. सॅनिटायजरचा वापर करण्याबाबत संबंधित ग्राम सेवक व ग्राम रोजगार सेवकांना दक्षता घेण्याबात सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. 

प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये कामे उपलब्ध आहे. त्यामूळे कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने जे मजूर शहरी भागातून गावाकडे परतले आहेत. त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असे जिल्हा परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com