Agriculture news in marathi Work plan to tackle scarcity in Aurangabad district | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई निवारण्यासाठी कृती आराखड्यावर मदार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे निवारण करण्याची मदार जानेवारी ते जून २०२० दरम्यानसाठी तयार केलेल्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून असणार आहे. तूर्त जिल्ह्यात तीन ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या पाच टॅंकरने पाणीटंचाईचे संकट कायम असल्याचे संकेत दिले आहेत. 

औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे निवारण करण्याची मदार जानेवारी ते जून २०२० दरम्यानसाठी तयार केलेल्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून असणार आहे. तूर्त जिल्ह्यात तीन ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या पाच टॅंकरने पाणीटंचाईचे संकट कायम असल्याचे संकेत दिले आहेत. 

ऑक्‍टोबर महिन्यात अवेळीच्या पावसामुळे पाणीटंचाईचे संकट यंदा नसेल असे सर्वांनाच वाटले. परंतु, पडलेला हा पाऊस सर्वदूर समान नसल्याने जिल्ह्यातील अनेक पाणीसाठ्यांची व भूगर्भाची तहान कायम राहिली. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील एकूण ६५ पैकी जवळपास २० ते २२ मंडळात गतपाच वर्षांत व यंदाही सरासरीइतका पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्याचा सरासरी पाऊस अपेक्षेच्या पुढे जाऊन दिसत असला, तरी प्रत्यक्षात काही भागात यंदा पाणीटंचाईला सामोर जावे लागण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई भासू शकणाऱ्या ५६१ गावे व ५४ वाड्यांची संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी जानेवारी ते जून २०२० साठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. 

जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून २०२० अशा दोन टप्प्यांत या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे नियोजन केले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३१८ गावे व ४४ वाड्यांसाठी ६५२ योजनांसाठी अंदाजे आवश्‍यक खर्च १६ कोटी ९९ लाख प्रस्तावित करण्यात आला. तर, दुसऱ्या टप्प्यात २४३ गावे व दहा वाड्यांच्या टंचाईच्या उपाययोजनांसाठी ४६० योजनांच्या पूर्ततेसाठी ११ कोटी ८३ लाख रुपये खर्च,  दोनही टप्पे मिळून जानेवारी ते जून २०२० दरम्यान ५६१ गावे व ५४ संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठीच्या ९११२ प्रस्तावित योजनांसाठी २८ कोटी ८२ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

टॅंकरच्या फेऱ्या सुरू

औरंगाबाद तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या सांजखेडा येथे पाणीटंचाई निवारण्यासाठी दोन टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय पैठण तालुक्‍यातील बालानगर येथे दोन, तर गंगापूर तालुक्‍यातील आंबेगाव, हैबतपूर व मुस्तफाबाद या तीन गावातील पाणीटंचाई निवारण्यासाठी एका टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...
चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके,...चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व...
बंदीवानांनी पिकवला भाजीपालाअकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत...
नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल...नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे...औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे...
अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्याअकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात...
अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन...अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक...
वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य...
लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा...
हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले...वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍...
नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले...देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली...नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या...
पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून...पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या...
इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळपुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू...
`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी...