पंतप्रधान आवास योजनेतील कामे रखडली

पंतप्रधान आवास योजनेतील कामे रखडली
पंतप्रधान आवास योजनेतील कामे रखडली

जळगाव : जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेसंबंधीचा सुमारे ११०० घरांचा लक्ष्यांक अपूर्ण असून, मागील आर्थिक वर्षातील अनेक कामेही रखडली आहेत. ती ऑगस्टअखेर पूर्ण करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक सुनील गायकवाड यांनी तालुकानिहाय आढावा बैठकीत दिले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे तालुकानिहाय आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत नुकतेच रुजू झालेल्या प्रकल्प संचालक सुनील गायकवाड यांनी घरकुलांचा लक्ष्यांक, झालेली कामे, अपूर्ण कामे, त्याची कारणे आदींचा आढावा घेतला. जिल्ह्यातील १५ तालुक्‍यांमध्ये सोमवारी (ता.९) आढावा बैठका झाल्या. त्यात सविस्तर माहिती घेऊन त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

लाभार्थीला जागा मिळत नसल्याने काही कामे अपूर्ण असल्याचे समोर आले. त्यानुसार संबंधितांना पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठी अनुदानाचे किती वितरण झाले, याची माहिती घेण्यात आली.

जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये साडेचार हजार घरकुले पूर्ण करायची आहेत, तर मागील वर्षातील (२०१७-१८) अपूर्ण कामेदेखील पूर्ण करायची आहेत. काही ठिकाणी लाभार्थींना थेट अनुदान मिळण्यास अडचणी असल्याच्या तक्रारी आहेत. ही प्रकारणे मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे प्रलंबित असल्याची कारणे कर्मचाऱ्यांनी सांगितली. काही घरकुले दोन हप्ते वितरित करूनही गतीने झालेली नाहीत. अशा प्रकरणांमध्ये अपेक्षित काम पूर्ण करून घेतल्यानंतरच उर्वरित रक्कम लाभार्थीला द्यावी, याबाबत गायकवाड यांनी सूचना दिल्या. 

१ लाख २० हजार रुपये अनुदान प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभार्थींना दिले जाते. या रकमेचे वितरण चार हप्त्यात करायचे असून, हे वितरण कसे झाले आहे, याची माहिती त्यांनी घेतली, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com