‘पोकरा’मध्ये कामाची प्रक्रिया आता ऑनलाइन

नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनामध्ये होणारी मृद्‍ व जलसंधारण कामाची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन होणार आहे. यासाठी पोर्टल तयार करण्यात आले असून कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २५) त्याचे लोकार्पण करण्यात आले.
The work process in Pokra is now online
The work process in Pokra is now online

मुंबई/औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनामध्ये होणारी मृद्‍ व जलसंधारण कामाची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन होणार आहे. यासाठी पोर्टल तयार करण्यात आले असून कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २५) त्याचे लोकार्पण करण्यात आले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत होणाऱ्या विविध कामांचा आढावा कृषिमंत्री भुसे यांनी गुरुवारी घेतला. या वेळी ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव सुशील खोडवेकर, अवरसचिव श्रीकांत आडंगे व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील जवळपास चार हजार गावांमध्ये लोकसहभागातून सूक्ष्म नियोजन आराखडा प्रक्रिया राबविण्यात येत ंंआहे. ही प्रक्रिया गावांमध्ये प्रत्यक्ष कशी राबविली जात आहे, याबाबत कृषिमंत्री भुसे यांनी उस्मानाबाद, बीड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा या सात जिल्ह्यांतील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, शेतकरी, कृषी अधिकारी, कृषीताई, तसेच भारतीय जैन संघटनेचे शांतिलाल मुथा यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

श्री. मुथा म्हणाले, की बुलडाणा जिल्ह्यात गावपातळीवर सरपंच, पदाधिकारी व अधिकारी यांच्या सहकार्याने शेततळी खोदाईच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खोदाई मशिनच्या वाहतुकीचा खर्च वाचून ही कामे गाव समूह अनुसार राबवू. या कामाला आता लोकचळवळीचे स्वरूप येत आहे. लोकसहभागातून शेततळी उभारणीसाठी बुलडाणा जिल्हा राज्यात नव्हे, तर देशात पथदर्शी ठरेल. या कामी समन्वयासाठी गावचे सरपंच हे या चळवळीचे दुत तथा ॲम्बेसिडर आहेत. काम करताना प्रकल्पांतर्गत मृद्‍ व जलसंधारण कामाची प्रक्रिया ऑनलाइन करण्यास सुरुवात झाली आहे. कामाच्या प्रमाणात कंत्राटदारांची बिले थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक व वेगवान होण्यास मदत झाली आहे.

कृषिमंत्री भुसे म्हणाले...

  • ऑनलाइन माहिती संकलन हंगाम नियोजनासाठी उपयुक्त
  • ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेला अनुसरून नियोजन करा
  • उपलब्ध पिकांच्या प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन द्यावे
  • शेततळे बांधताना गाळ साचणार नाही याची काळजी घ्या
  • जैन संघटनेचे शेततळ्यांसाठी खोदाई यंत्रे देऊन सहकार्य
  • बुलडाण्याच्या खारपाणपट्ट्यातील कामे शेतकऱ्यांसाठी प्रेरक
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com