परभणी जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींची कामे सुरू

परभणी जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींची कामे सुरू
परभणी जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींची कामे सुरू

परभणी : ‘‘जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ७०४ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सुमारे ६०० सार्वजनिक पाणीपुरवठा विहीरींची कामे केली जाणार आहेत. त्याद्वारे ग्रामीण भागात उद्भभवणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यात येईल. या कामांसाठी नऊ तालुक्यांतून ५८२ प्रस्ताव सादर केले आहेत. त्यापैकी १४४ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळाली. ३८ कामे सुरू झाले आहेत,’’ अशी माहिती मनरेगा कक्षातील कृषी अधिकारी स्वप्निल पवार यांनी दिली.

जिल्ह्यात गेल्या वर्षापासून पावसाची अनियमिता, असमान वितरण यामुळे भूजलपातळीत वाढ होत नाही. धरणे, तलावांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होत नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्भवते. प्रशासनाकडून पाणीटंचाई निवारणार्थ विहीर अधिग्रहण, टॅंकरने पाणीपुरवठा आदी उपयायोजना केल्या जातात. परंतु, त्यावर मोठा खर्च होतो. त्यामुळे पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना गावातच पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी निर्देश दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली या विहिरी खोदण्यासाठी योजना तयार करण्यात आली.

या विहिरीची कामे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक जागेमध्ये केली जाणार आहेत. विहिरींना पाणी लागल्यानंतर गावांचा पाणी प्रश्न निकाली निघेल. 

योजनेची तालुकानिहाय स्थिती

तालुका प्रस्ताव  प्रशासकीय मान्यता
परभणी ११३ ३५
जिंतूर  ९३   २६
सेलू ५२
मानवत ४१   १२
पाथरी ५६  १६
सोनपेठ  ३०
गंगाखेड ६० १९
पालम  ४९ ११
पूर्णा  ८८ १३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com