agriculture news in Marathi work of samrudhhi highway on fast track Maharashtra | Agrowon

समृद्धी महामार्गाचे काम गतीने सुरु 

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

टाळेबंदीच्या काळात मुंबईसह राज्यातील काही महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. त्यात मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाचाही समावेश आहे.

मुंबई: टाळेबंदीच्या काळात मुंबईसह राज्यातील काही महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. त्यात मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाचाही समावेश आहे. टाळेबंदीच्या घोषणेनंतर १० एप्रिलपासून समृद्धीच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे टाळेबंदी आणि सामाजिक अंतर रांगत यावर तब्बल १७ हजार ५०० मजूर काम करत आहेत. 

मुंबई ते नागपूर प्रवास वेगवान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या, प्रकल्पाला जोरदार विरोध झाला आणि आजही विरोध होत आहे. मात्र, तरीही प्रकल्पाचे काम कुठेही थांबलेले नाही. अगदी टाळेबंदीतही काम सुरु आहे. 

जनता कर्फ्यू लागल्यानंतर अर्थात २२ मार्चपासून हे काम बंद होते. त्यामुळे एकीकडे मोठे आर्थिक नुकसान होत होते. तर, दुसरीकडे १७ हजार ५०० मजूर बसून होते. हे मजूर एकार्थाने विलगीकरणातच होते. ज्या १६ कन्स्ट्रक्शन पॅकेजमध्ये काम सुरु आहे. त्यातील २ ते ३ पॅकेज वगळले तर इतर सर्व ठिकाणे ग्रीन झोनमध्ये लोकवस्तीपासून दूर आहेत. त्यामुळे या कामांना परवानगी देण्याची मागणी एमआरडीसीकडून प्रत्येक पॅकेजमधील जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यात आली होती. 

ही मागणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळाली आणि १० एप्रिलपासून कामाला सुरुवात झाल्याची माहिती एमएसआरडीसी सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली आहे. १७ हजार ५०० मजुरांची योग्य ती काळजी घेत काम सुरु आहे. तर, मुंबई-ठाणे-पालघरमध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने काम संथगतीने सुरु असून इतरत्र ठिकाणी कामाने वेग पकडला आहे. त्यामुळेच आत्तापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यात भराव टाकणे, रस्त्याची कामे आणि पुलाच्या कामाचा समावेश आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले. तर, कामाचा वेग येत्या काळात वाढवत प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...