agriculture news in marathi, work stoped in Grampanchayats due to lack of operators | Agrowon

ऑपरेटर्सअभावी ग्रामपंचायतींमधील कामे रखडली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 ऑगस्ट 2018
जळगाव : ऑनलाइन कामांच्या नोंदी करण्यासाठी संग्राम कक्षांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये नेमण्यात आलेले ऑपरेटर नियमित कामावर येत नसल्याने कामे रखडल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात सुमारे आठशे ऑपरेटर असून, ग्रामपंचायतींच्या अहवालानंतर त्याची फेरचौकशी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याचे स्थायी समितीच्या सभेत ठरविण्यात आले आहे.
जळगाव : ऑनलाइन कामांच्या नोंदी करण्यासाठी संग्राम कक्षांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये नेमण्यात आलेले ऑपरेटर नियमित कामावर येत नसल्याने कामे रखडल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात सुमारे आठशे ऑपरेटर असून, ग्रामपंचायतींच्या अहवालानंतर त्याची फेरचौकशी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याचे स्थायी समितीच्या सभेत ठरविण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ३०) स्थायी समितीची सभा झाली. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण, सदस्य कैलास सरोदे, मधुकर पाटील, ज्योती पाटील, शशिकांत साळुंखे, सरोजिनी गरुड, मनोहर गिरधर पाटील, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे आदी उपस्थित होते.
ऑपरेटर्सच्या कामाविषयीच्या चौकशीचा ग्रामपंचायतींचा अहवाल आल्यानंतर त्याची ‘क्रॉस चेकिंग'' करण्याचे निश्‍चित करण्यात आले. शिवाय, चौदाव्या वित्त आयोगांतर्गत निधी व्यवस्थित खर्च होत नाही. या कारणावरून ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटेंना सभापती भोळे यांनी धारेवर धरले.

चौकशीसाठी समिती
जिल्हा परिषदेअंतर्गत होणाऱ्या दहा टक्‍क्‍यांवरील ‘बिलो'' कामे घेतली जातात. या कामांच्या निरीक्षणांतर्गत त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे दहा टक्‍क्‍यांच्या वरील बिलो कामांचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी अध्यक्षा व उपाध्यक्षांच्या नियंत्रणाखाली समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये त्या-त्या गटातील जिल्हा परिषद सदस्याला सोबत घेऊन कामांची तपासणी करण्याचा ठराव सभेत करण्यात आला.
पाणी टंचाई परिस्थिती पाहून एक महिन्याची मुदतवाढ देण्यासंदर्भातील ठराव करून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे पाठविण्याचे निश्‍चित करण्यात आले. 

 
 

इतर बातम्या
मराठवाड्यातील ९१ मंडळांत पाऊस औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील २७२...
आटपाडीतील कालव्याचे अस्तरीकरण पूर्णखरसुंडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्यातील ३२...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड : यंदा जिल्ह्यात ७ लाख ५८ हजार ४०५...
‘कृषी संजीवनी’तील कामांची जागतिक...नांदेड : कामठा बुद्रुक (ता. अर्धापूर) येथील...
आंबेगाव तालुक्यात बटाटा लागवड सुरूमहाळुंगे पडवळ, जि. पुणे  : आंबेगाव तालुक्‍...
देशात सेंद्रिय उत्पादन कमीच ः रीता...पणजी: देशात सेंद्रिय उत्पादनांना ग्राहक...
`पशुपालन, दुग्धव्यवसायातून होईल उत्पन्न...पुणे  ः केवळ शेतीवर अवलंबून राहून...
यंदा हंगामात सोयाबीनच्या दरात तेजीचा...अमरावती  ः सोयाबीनचा हंगाम सुरू होण्यास...
बाळापूर, बार्शीटाकळी, खामगाव, मलकापूरला...अकोला ः  वऱ्हाडातील अकोला व बुलडाणा...
मक्यावरील लष्करी अळीमुळे पोल्ट्री...नाशिक : मागील वर्षी मका उत्पादन कमी झाल्यामुळे...
पुणेगाव कालव्याला गळतीमुळे पिकांचे...नाशिक  : चालू वर्षी पाऊस अधिक झाल्याने...
चार साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाईपुणे : गाळप हंगाम २०१८-१९ मधील ऊस उत्पादकांची...
सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी...कऱ्हाड, जि.सातारा ः शेतकऱ्यांनी कर्ज काढून,...
नगर जिल्ह्यात रब्बीत ज्वारी बियाणे...नगर  ः पेरणी करताना पारंपरिक बियाण्यांपेक्षा...
युतीची चिंता आम्हालाही; लवकरच निर्णय :...मुंबई ः राज्यात भाजपचेच सरकार पूर्ण बहुमताने...
मराठवाडा दुष्काळमुक्त करणे हाच आमचा...पुणे  ः देशाची विजेची मागणी पूर्ण झाली असून...
काही भागांत उद्या हलक्या पावसाचा अंदाज पुणे: बंगालचा उपसागर आणि आंध्र प्रदेशाच्या...
केंद्रीय पथकाकडून कांदास्थितीचा आढावा...नाशिक : कांदा दरस्थिती, मागणी आणि पुरवठा व नवीन...
राज्याचा कृषिरत्न पुरस्कार विश्वंभर...पुणे ः कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन...
‘पोकरा’च्या शेळ्या होताहेत गायबअकोला : राज्यातील १५ जिल्ह्यांत राबविल्या जात...