Agriculture news in Marathi The work was hampered by the demise of the Talathas | Page 2 ||| Agrowon

तलाठ्यांच्या संपामुळे कामे खोळंबली 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

राज्य तलाठी संघटनेच्या अध्यक्षांनी टाकलेल्या एका मॅसेजवर राज्य समन्वयक विभागाचे जमाबंदी आयुक्त रामदास जगताप यांनी अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप करत गेल्या दहा दिवसांपासून राज्यभर तलाठ्यांनी संप सुरू केला आहे. 

नगर : तलाठ्यांच्या कामकाजासंदर्भात समन्वय ठेवण्यासाठी असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर राज्य तलाठी संघटनेच्या अध्यक्षांनी टाकलेल्या एका मॅसेजवर राज्य समन्वयक विभागाचे जमाबंदी आयुक्त रामदास जगताप यांनी अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप करत गेल्या दहा दिवसांपासून राज्यभर तलाठ्यांनी संप सुरू केला आहे. 

या संपात राज्यभरातील सुमारे साडेबारा हजार तलाठी सहभागी झाले आहेत. या संपामुळे मात्र शेतकरी, नागरिकांची कामे खोळंबली आहेत. जगताप यांची बदली करावी, अशी संघटनेची मागणी आहे. संप सुरू होऊन दहा दिवस झाले आहे. आपत्ती व निवडणूक वगळता अन्य सर्व कामे बंद आहे. 

राज्यातील तलाठ्यांना समन्वय ठेवण्यासाठी व कामकाजाचे नियोजन करण्यासाठी राज्य तलाठी संघाचा सोशल मीडियावर एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर दहा दिवसांपूर्वी तलाठी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्‍वर डुबल यांनी कामकाजासंदर्भात एक मेसेज पाठवला होता. त्या ग्रुपवर डुबल यांच्या मेसेजला उद्देशून राज्य समन्वयक विभागाचे जमाबंदी आयुक्त रामदास जगताप यांनी ‘‘मुर्खासारखे मेसेज टाकू नका,’’ अशी टिप्पणी केली. डुबल हे तलाठ्यांचे नेते आहेत. त्यांच्या मेसेजला उद्देशून जाणीवपूर्वक अवमानकारक टिप्पणी करणारे जगताप कामकाजाबाबत तलाठ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप आहे.

राज्यातील सुमारे साडेबारा हजार तलाठी यात सहभागी झाले आहेत. बदली झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचे संघटनेने सांगितले. संप असल्याने आपत्ती व निवडणूक वगळता संगणकीय व इतर सर्व कामे तलाठ्यांनी बंद ठेवली आहेत. सरकारी पातळीवर मात्र दहा दिवस होऊनही हे दखल न घेतल्याने शेतकरी, नागरिकांची मात्र अनेकांची गैरसोय होत आहे.

राज्य तलाठी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर डुबल हे तलाठी आणि नागरिक, शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतात. त्यांच्या मेसेजला उद्देशून जगताप यांनी जाणीवपूर्वक टिप्पणी केली. तलाठ्यांना सतत वेठीस धरणारे जगताप यांची बदली व्हावी यावर आम्ही ठाम आहोत.
- डी. जी. भुजबळ, जिल्हाध्यक्ष, तलाठी महासंघ 

महात्मा गांधी योजनेतून मला विहिरीचे प्रकरण करायचे असून, त्यासाठी तलाठी कार्यालयातून फेर काढायचे आहेत. अनेक दिवसांपासून मी कार्यालयात चकरा मारत आहे. मात्र संप सुरू असल्याने काम होत नाही. 
- बळिराम शिरसाठ, शेतकरी, शिरसाठवाडी, ता. पाथर्डी


इतर बातम्या
जळगाव : नावासह पत्ता दुरुस्तीसाठी  ६५...जळगाव : जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडत जळगाव ः खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडतच सुरू...
नाशिक : दुधाळ जनावरांच्या गटवाटप ...नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण...
सोलापूर :सिद्धेश्‍वर कारखान्याला...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्जपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
सोलापूर जिल्ह्यातील एकरावरील फळबागा...सोलापूर, केम : करमाळा तालुक्‍यातील केम,...
 पीकविम्याची रक्कम जमा होण्यास प्रारंभ बुलडाणा ः जिल्ह्यात गेल्या काळात अतिवृष्टीने...
सहा वर्षांत अडीच हजारांवर  शेतकरी...अमरावती ः शेतकरी आत्महत्येनंतर त्यांच्या...