नरहरी झिरवाळ : बिगारी कामगार ते विधानसभेचे उपाध्यक्ष

narhari-zirwal
narhari-zirwal

नाशिक : पांढरा सदरा, पायजमा व पांढरी टोपी, असा साध्या पोशाखात राहणारा साधा कार्यकर्तावजा नेता म्हणजेच नरहरी झिरवाळ. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना लोकांमध्ये मिसळून जाण्याची सहज कला व दांडगा जनसंपर्क या जोरावर श्री. झिरवाळ हे तिसऱ्यांदा दिंडोरी-पेठ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या उपसभापतिपदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकली आहे. कुटुंबातील परिस्थिती हलाखीची असताना उदरनिर्वाह करण्यासाठी बांधकामामध्ये बिगारीचे काम करणारा एक सर्वसाधारण माणूस आज राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी विराजमान झाला आहे. राज्यात विधानसभा स्थापन झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातून पहिले उपाध्यक्ष ठरले आहेत. दिंडोरी तालुक्यातील वनारे हे नरहरी झिरवाळ यांचे गाव. प्राथमिक व  महाविद्यालयिन शिक्षण त्यांनी कला शाखेत वणी येथे घेतले. पुढे दिंडोरी तहसील कार्यालयात लिपीक म्हणून काम केले. मात्र मन न रमल्याने त्यांनी नोकरी सोडली. गावात शेती व इतर कामे करताना सामाजिक उपक्रमात ते सक्रिय राहिले. जनता दलाचे माजी खासदार कै. हरिभाऊ महाले यांच्यासोबत राहून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. त्यानंतर गावच्या राजकारणात प्रवेश करून ते वनारे गावाचे सरपंचही झाले. सरपंचपदानंतर त्यांच्या कामाची पद्धत पाहून जनता दलातून एकदा पंचायत समितीचे सदस्य व तर राष्ट्रीय कॉंग्रेसमधून उपसभापतिपद मिळाले. पुढे राजकीय कारकीर्द वाढत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडून २००१ साली जिल्हा परिषदेचे सदस्य होण्याची संधी मिळाली. यानंतर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली व ते आमदार झाले. पुढे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा १४९ मतांनी निसटता पराभव झाला. त्यानंतर लोकसभेची उमेदवारी केली, त्यातही त्यांना पराभव पत्करावा लागला. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून २००४, २०१४ व २०१९ या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये झिरवाळ तीन वेळा आमदार झाले आहेत. ...आजही ते शेती करतात आदिवासी भागातील लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जलसंधारण, कुपोषणमुक्ती, जंगलतोड बंदी, आदिवासी बांधवांचे प्रश्न आणि महाराष्ट्र गुजरात पाणी प्रश्नावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. तसेच आजही ते शेती करतात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर त्यांची प्रचंड निष्ठा आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना संधी मिळाली आहे. पक्षाने त्यांच्या निष्ठेची दखल घेत सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेचे उपाध्यक्षपद दिल्याने जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com