Agriculture news in Marathi, Workers appointed in the election should work in coordination with: Dr. Dung Dang | Agrowon

निवडणुकीत नियुक्त पथकांनी समन्वयाने काम करावे ः डॉ. निरुपमा डांगे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीत प्रशासनाने विविध पथकांची नियुक्ती केली आहे. स्थायी पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक व तपासणी नाका पथकांमधील कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रामाणिकपणे काम करावे. उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची नोंद करावी. त्यासाठी नियुक्त पथकांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिल्या.

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीत प्रशासनाने विविध पथकांची नियुक्ती केली आहे. स्थायी पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक व तपासणी नाका पथकांमधील कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रामाणिकपणे काम करावे. उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची नोंद करावी. त्यासाठी नियुक्त पथकांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिल्या.

विधानसभा मतदारसंघनिहाय स्थायी, व्हिडिओ सर्वेलान्स व सहायक खर्च निरीक्षक यांची बैठक निवडणूक खर्च निरीक्षक यांच्यासमवेत जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. 

या प्रसंगी व्यासपीठावर मलकापूर, खामगाव व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघांसाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक ब्रजेश कुमार, बुलडाणा व चिखली विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक किण्व बाली, आयकर विभागाचे श्रवण कुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत आदी उपस्थित होते.

पथकांमधील सदस्यांनी काम करताना मिळालेल्या न्यायिक अधिकारांचा उपयोग करण्याच्या सूचना देत खर्च निरीक्षक किण्व बाली म्हणाले, व्हिडिओ सर्वेलान्स पथकाने चेक नाक्यांवर वाहन तपासणी करताना पूर्ण पुरावे व्हिडिओत घ्यावे. जाहीर सभांमध्ये प्रत्येक खर्चाची नोंद घ्यावी. ही नोंद घेण्यासाठी शॅडो रजिस्टर देण्यात आले आहे. शॅडो रजिस्टर व उमेदवारांनी सादर केलेला खर्च याचा ताळमेळ लावावा. कुठल्याही परिस्थितीत उमेदवाराने केलेला खर्च सोडू नये. हे काम करताना न्यायपूर्वक व्यवहार ठेवत दबावाला बळी पडू नये. रॅलीमधील पूर्ण वाहनांचे शूटिंग घ्यावे. त्यामध्ये प्रकर्षाने वाहन क्रमांक आले पाहिजेत.

खर्च निरीक्षक ब्रजेश कुमार म्हणाले, तपासणी नाक्यांवर संशयित व उमेदवारासंबंधी प्रत्येक वाहन चेक करावे. रोख रक्कम सापडल्यास त्वरित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी. पोलिसांच्या सहकार्याने पुढील कार्यवाही करावी. आयकर विभागाचे श्रवण कुमार यांनी मार्गदर्शन केले.


इतर बातम्या
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
किटकनाशकांचा अतिवापर टाळावा ः घाडगेपुणे : ‘‘खरीप हंगामात पिकांवर रोग किडीवर मोठ्या...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...