स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी शेतकरी प्रश्नी रस्त्यावर उतरावे : रविकांत तुपकर

रविकांत तुपकर
रविकांत तुपकर

बुलडाणा  ः  केंद्र व राज्य सरकारने आतापर्यंत खूप घोषणा करून सत्ता मिळवली. पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना या सत्तेचा काहीच लाभ मिळाला नाही. यापुढे शेतकऱ्यांचे काही खरं दिसत नाही. त्यामुळे ‘स्वाभिमानी’ यापुढे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणार आहे. कायकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरावे, अशी सूचना स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली.

वरवट बकाल येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यकर्ता बैठकीत श्री. तुपकर बोलत होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे खचून जाऊ नका, असे आवाहन करीत त्यांनी सरकारच्या कारभारावर चौफेर टीका केली.  

श्री. तुपकर म्हणाले, की तीन वर्षांतील दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था खूपच नाजूक झाली आहे. असे असताना सरकार व विमा कंपनीने साटेलोटे करून पीकविम्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचू दिला नाही. त्यामुळे सरकार व कंपनीच्या विरोधात ‘स्वाभिमानी’ न्यायालयीन लढाई लढून शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पीककर्ज मागण्यासाठी शेतकरी बँकेत जातात. पण जाचक अटींमुळे त्यांना परतावे लागते. राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना पीककर्ज वाटपाचे स्पष्ट निर्देश नसल्याने शेतकऱ्यांची अडवणूक करतात तर दुसरीकडे सत्ताधारी नेते पीककर्ज वाटपाच्या मोठमोठ्या घोषणा करतात. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. केवळ आश्वासनावर जगविणाऱ्या या सरकारला आपण धडा शिकवणार आहोत.

श्याम अवथळे, अनंता मानकर यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. बैठकीला रोशन देशमुख, उज्ज्वल चोपडे, योगेश मुरुख, आशिष नांदोकार, विलास तराळे, नितीन पाचपोर, सय्यद बाहोद्दीन, वैभव वानखडे, प्रतीक गावंडे, रोशन मानकर, गोपाल तायडे, विठ्ठल वखारे, मोहन बाठे, राजू उगळकार, उज्ज्वल खराटे, गजानन आमझरे, सागर खानझोड यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते यावेळीउपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com