agriculture news in Marathi working for hapus export Maharashtra | Agrowon

हापूसच्या निर्यातीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न; कंट्रोल रुम सुरु

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊनचा मोठा फटका कोकणातील हापूस बागायतदारांना बसला आहे.

मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊनचा मोठा फटका कोकणातील हापूस बागायतदारांना बसला आहे. हापूसला उठाव नसल्याने बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने हापूसच्या निर्यातीला चालना देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी मुंबई बाजार समितीत बुधवारपासून (ता.१) कंट्रोल रुम सुरु करण्यात आले आहे. 

सध्याच्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे कोकणातील हापूस बागायतदार मोठ्या चिंतेत आहेत. कोकणातील हापूसचा आंबा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, कोरोनामुळे २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे आंब्याला ग्राहक मिळणे कठीण झाले आहे. आंब्याची वाहतूक करण्यासाठी प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे. भाजीपाला, फळांचा अत्यावश्यक सेवेत समावेश असला तरी हापूसला उठाव नाही, मागणी ठप्प आहे. आंबा हे नाशवंत फळ असल्याने आंबा तोडणी झाल्यानंतर व आंबा तयार झाल्यानंतर त्याची वेळेत विक्री होणे आवश्यक असते. 

यावर्षी अवकाळी पावसामुळे आंबा हंगामाला उशीर झाला. आता आंबा हंगाम सुरू झाला आणि कोरोनाचे संकट जगावर आले. त्यामुळे आंबा निर्यातीवर सुद्धा मोठी संक्रांत आली आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याचे उत्पादन घेतले जाते. हंगाम सुरू झाल्याने झाडांवर मोठ्या प्रमाणात आंबा तयार झाला आहे. तयार झालेला आंबा काढण्यासाठी आंबा बागायतदार तयार आहेत. पण, कोरोनाच्या संकटामुळे आंबा बागायतदार मोठ्या चिंतेत आहेत. 

यातून मार्ग काढण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने कंबर कसली आहे. निर्यातीच्या माध्यमातून हापूसला मार्केट मिळवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी निर्यातीशी संबंधित वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली कंट्रोल रुम सुरु करण्यात आली आहे. बाजार समितीमधील निर्यातदारांना ज्या ज्या सेवा-सुविधा अपेक्षित आहेत, त्या एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

निर्यातीसाठी आवश्यक असणारी वेगवेगळी प्रमाणपत्रे, ट्रान्सपोर्ट व्हेईकल, पॅकिंग मटेरियल आदी सर्व सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. त्यासाठी परिवहन, पोलीस, एमआयडीसी, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विभाग, जेएनपीटी, राज्याचे कृषी खाते, पणन विभाग आदी विभागांचे नोडल अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. 

जलवाहतुकीला प्राधान्य 
सध्या हवाई वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे जल वाहतुकीमार्गे हापूसची निर्यात करण्याला प्राधान्य दिले जात आहे. या माध्यमातून निर्यातदारांना येणाऱ्या अडी-अडचणींवर मार्ग काढला जात आहे. निर्यातदारांना विविध सेवा-सुविधा पुरवून हापूसच्या निर्यातीचे प्रयत्न केले जात आहेत. जेणेकरून कोकणातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...