agriculture news in Marathi works from rural area became on track Maharashtra | Agrowon

ग्रामीण भागात व्यवहार सुरळीत 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 मे 2020

चाळीस दिवसाच्या कडक संचारबंदीनंतर सोमवारपासून (ता.४) संचारबंदीमध्ये शिथीलता निर्माण केली आहे तरीदेखील काही दुकाने बंद आणि काही दुकाने सुरू असे चित्र शहरात होते.

कोल्हापूर: चाळीस दिवसाच्या कडक संचारबंदीनंतर सोमवारपासून (ता.४) संचारबंदीमध्ये शिथीलता निर्माण केली आहे तरीदेखील काही दुकाने बंद आणि काही दुकाने सुरू असे चित्र शहरात होते. जिल्हा ऑरेंज झोन मध्ये आहे. रविवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या बाबतच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. 

व्यापारी संकुले अथवा व्यापारी पेठांमध्ये एकाच वेळेस पाचपेक्षा अधिक दुकाने उघडता येणार नाहीत, अशी जाचक अट घातल्याचा फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. त्यामुळे चाळीस दिवसाच्या संचारबंदीनंतर सोमवारी देखील अनेक दुकाने बंद राहिली. शहरातील चर्मकार लाईन, शिवाजी रोड, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी व्यापारी पेठ, शाहूपुरी व्यापारी पेठ येथील अनेक दुकाने बंदच राहिली. जिल्ह्यातील बहुतांशी गावात नियमित व्यवहार सुरू झाले आहेत. 

ग्रामीण भागातील बाजापेठा सकाळपासूनच गजबजलेल्या होत्या. काही भागात अजून ही संभ्रमावसस्था असल्याने काही दुकाने बंद होती. ग्रामपंचायत पातळीवर अनेक ठिकाणी स्थानिक व्यापाऱ्यांशी चर्चा करून व्यहवार सुरळीत करण्याबाबत निर्णय होत होते. कृषी निविष्ठा विक्री करणारी दुकाने अगोदरच सुरू आहेत. काही ठिकाणी बंद असलेले रस्ते ही सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु लोकांची गर्दी होत असल्याने लोकांनी सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करण्याचे आवाहन करून सुद्धा अनेक ठिकाणी काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र होते. 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...