agriculture news in marathi, workshop on bollworm control technique, nagar, maharashtra | Agrowon

बोंड अळीवर उपाययोजनांसाठी यंत्रणांनी सज्ज राहावे : डॉ. विश्वनाथा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 जून 2018

नगर  ः कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गतवर्षी मोठे नुकसान झाले. यंदा बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी यंत्रणानी सज्ज राहावे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कापूस सुधार प्रकल्पात शुक्रवारी (ता. ८) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व आत्मा यांच्यातर्फे कापूस बोंड अळी नियंत्रणासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. विश्‍वनाथा बोलत होते.

नगर  ः कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गतवर्षी मोठे नुकसान झाले. यंदा बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी यंत्रणानी सज्ज राहावे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कापूस सुधार प्रकल्पात शुक्रवारी (ता. ८) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व आत्मा यांच्यातर्फे कापूस बोंड अळी नियंत्रणासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. विश्‍वनाथा बोलत होते.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कृषीचे विभागीय सहसंचालक दादासाहेब सप्रे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, संशोधक संचालक डॉ. शरद गडाख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रावसाहेब भारूड, कृषी उपसंचालक विलास नलगे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आर. के. गायकवाड, बी. एन. मुसमाडे, आत्माचे उपसंचालक सुरेश जगताप, तंत्र अधिकारी अशोक संसारे, बाळासाहेब नितनवरे, रामदास दरेकर यावेळी उपस्थित होते.

डॉ. विश्वनाथा म्हणाले, की जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र वाढत आहे. गतवर्षी गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागला. त्यामुळे यावर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार नाही याकरिता कृषी विभाग, विद्यापीठाने योजना आखली आहे. यंदा शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही त्यादृष्टीने यंत्रणानी काम करावे. यंदा कापुस उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

आतापर्यंत बोंड अळी नियंत्रणावर आठ कार्यशाळा झाल्या आहे. गावागावो कार्यक्रम घेतले आहे. कृषी सहायकावर याबाबतची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना वेळोवळी मार्गदर्शन करायचे आहे. जैविक कीड नियंत्रणाबाबत शंभर हेक्‍टरवर प्रकल्प राबवला जाणार आहे. गतवर्षी कमी उत्पादन आलेल्या गावात पीक प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे, ’’ असे पंडित लोणारे यांनी सांगितले. 

यावेळी डॉ. आर. एस. वाघ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एन. के. भुते यांनी सूत्रसंचालन केले. सोपान मोरे यांनी आभार मानले. प्रारंभी शेतकरी जगन्नाथ मदने यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन या घडीप्रत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.  

कार्यक्रम दोन तास उशिरा
नगर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेला शेतकरी मेळावा दोन तास उशिरा सुरू झाला. कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी झाली नसल्याने प्रमुख पाहुण्यांनाही काही काळ प्रतीक्षा करावी लागली.

इतर ताज्या घडामोडी
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...