Agriculture news in marathi; Workshop on Co-operative Elections in Akola District | Agrowon

अकोला जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात कार्यशाळा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

अकोला  ः जिल्ह्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात येथे संबंधित संस्थांचे व्यवस्थापक, गटसचिव, प्रतिनिधी यांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण एच. लोखंडे यांनी संस्थांच्या उपविधीनुसार निवडणुका घेण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सहायक निबंधक एस. डब्ल्यू. खाडे, मुख्य लिपिक वाय. पी. लोटे यांनी निवडणुकीबाबतच्या तरतुदी व करावयाच्या कार्यवाही, तसेच या वेळी प्राप्त प्रश्नांचे शंका निरसन केले.

अकोला  ः जिल्ह्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात येथे संबंधित संस्थांचे व्यवस्थापक, गटसचिव, प्रतिनिधी यांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण एच. लोखंडे यांनी संस्थांच्या उपविधीनुसार निवडणुका घेण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सहायक निबंधक एस. डब्ल्यू. खाडे, मुख्य लिपिक वाय. पी. लोटे यांनी निवडणुकीबाबतच्या तरतुदी व करावयाच्या कार्यवाही, तसेच या वेळी प्राप्त प्रश्नांचे शंका निरसन केले.

संस्थांच्या उपविधीनुसार पाच वर्षांत एका वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थिती, संस्थेच्या व्यवहार व उपविधीनुसार दिलेली पात्रता धारण करणारा व थकीत नसलेला सभासद हा मतदार होऊ शकतो, असेही या वेळी सांगण्यात आले. निवडणुकीकरिता संस्थांनी आवश्यक असलेली ई-१, ई-२, ई-३ या नमुन्यातील माहिती व निवडणूक निधी हा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी किंवा तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच प्रारूप मतदार यादीच्या सहा प्रती मुदत संपण्याच्या १२० दिवस अगोदर जिल्हा किंवा तालुका सहकारी निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करणे गरजेचे आहे.

याबाबतही सूचना देण्यात आली. क्रियाशील सभासदांच्या तरतुदी या निवडणुकीत लागू होत असल्याने संचालक मंडळाच्या निवडणुकीकरिता मतदार यादी तयार करताना अक्रियाशील यांचा समावेश मतदार यादीत होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, त्यानुसार २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबत सर्व संस्थांनी सूचनांप्रमाणे मुदतीत कार्यवाही करावी व निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. 

इतर ताज्या घडामोडी
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख...वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख...
खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक...जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात...
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधारअकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात...
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसानअमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन...
नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर...नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील...
 बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील...पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती...
मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील...औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१...
पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात...पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे...
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार...नगर  ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के...सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत...अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या...
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषदकोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर...
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
औरंगाबादमध्ये कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...