agriculture news in marathi, workshop on custard apple at rahuri, akola, maharashtra | Agrowon

सीताफळ महासंघाची शनिवारी राहुरीत राज्यस्तरीय कार्यशाळा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

अकोला  ः सीताफळ महासंघाच्या पुढाकाराने शनिवारी (ता. ६) राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नानासाहेब पवार सभागृहात राज्यस्तरीय कार्यशाळा अायोजित करण्यात आल्याची माहिती सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी यांनी दिली.

अकोला  ः सीताफळ महासंघाच्या पुढाकाराने शनिवारी (ता. ६) राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नानासाहेब पवार सभागृहात राज्यस्तरीय कार्यशाळा अायोजित करण्यात आल्याची माहिती सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी यांनी दिली.

महासंघातर्फे जळगाव, बार्शी, सासवड, नांदेड, नंदुरबार, जळगाव जामोद, सोलापूर, अंबाजोगाई, अकोला, परभणी, अमरावती, शेगाव अादी ठिकाणी सीताफळ कार्यशाळा घेण्यात अाल्या. राहुरी येथे होणाऱ्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा असतील. कार्यशाळेचे उद् घाटन भारतीय कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते होईल. या वेळी कृषी अायुक्त सचिंद्र प्रताप सिंह, कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय  कोलते उपस्थित राहतील.

या वेळी स्व. वि. ग. राऊळ स्मृती पुरस्कार वितरण, सीताफळाविषयी अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती, सीताफळ संशोधक शास्त्रज्ञ व सीताफळ प्रक्रिया उद्योजकांचा महासंघातर्फे सत्कार केला जाणार अाहे. या कार्यशाळेला सीताफळ बागायतदार, प्रक्रिया उद्योजकांनी उपस्थित राहण्याचे अावाहन  श्याम गट्टाणी, विद्यापिठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, महासंघाचे उपाध्यक्ष एकनाथ अागे, सचिव अनिल बोंडे, कोषाध्यक्ष मधुकर डेहनकर यांनी केले अाहे.

इतर ताज्या घडामोडी
लोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली...शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...
जळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...
केंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...
फळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...
सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...
अमरावती जिल्ह्याला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...
परभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...
हमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...
राज्यात रताळी ५०० ते ६००० हजार रुपये...जळगावात २२०० ते ३२०० रुपये  जळगाव...
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...