जगाचे वाळवंटीकरण रोखण्यासाठी दिल्लीत जागतिक परिषद

जगाचे वाळवंटीकरण रोखण्यासाठी दिल्लीत जागतिक परिषद
जगाचे वाळवंटीकरण रोखण्यासाठी दिल्लीत जागतिक परिषद

नवी दिल्ली ः संयुक्त राष्ट्रसंघातर्फे पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांपैकी नापीक जमिनीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठीची ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ अर्थात कॉप-१४ ही जागतिक परिषद येत्या २ ते १३ सप्टेंबर दरम्यान दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली. 

यानिमित्ताने जमिनीची हानी रोखण्याच्या उपायांचा ‘दिल्ली जाहीरनामा’ ही प्रकाशित केला जाणार आहे. या समस्येवर मात करण्यासाठी केंद्रातर्फे डेहराडून येथे ‘सेंटर ऑफ एक्‍सलन्स’ ही संशोधन संस्था स्थापन करण्यात येईल, अशीही घोषणा त्यांनी केली. वाळवंटीकरणाचा भयानक वेग रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून दर दोन वर्षांनी ‘कॉप १४’ ही आंतरराष्ट्रीय परिषद दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. यापूर्वी याचे यजनामपद चीनकडे होते व आता ते भारताकडे आले आहे. या समस्येवर उपाय व उत्तरे शोधून त्याबाबत जागतिक समुदायास मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आगामी दोन वर्षांत भारतावर असणार आहे. ग्रेटर नोएडा येथील पर्यावरण विभागाच्या भव्य संकुलात ही परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे जावडेकर यांनी पत्रकारांना सांगितले. 

या परिषदेत २०० देशांचे ३००० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यात १०० देशांचे पर्यावरण मंत्रीही असतील. २ ते ६ सप्टेंबरला परिषद होईल. त्यातील विचारमंथनावर आधारित सत्रात ११ ते १३ सप्टेंबरला पर्यावरणतज्ज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदींचे खुले सत्र होईल. त्यापूर्वी ९ किंवा १० सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या परिषदेला संबोधित करतील. त्यानंतर जमिनीचे वाळवंटीकरण रोखण्याच्या उपाययोजनांचा दिल्ली जाहीरनामा प्रकाशित करण्यात येईल, असेही जावडेकर यांनी सांगितले. या परिषदेतील प्रत्येक दिवस दुष्काळ, पूर, सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींबाबतच्या चर्चेसाठी राखून ठेवण्यात आला आहे. 

दिल्ली जाहीरनाम्यात दाखविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी जागतिक समुदायातील देश काटेकोरपणे करत आहेत काय, हे पाहण्याचीही जबाबारी आगामी २ वर्षांत भारतावर असेल. पूर, जमिनीत अतिरिक्त पाणी साचणे, जमिनीची अतिरिक्त धूप, शेतीत रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर ही जमीन नापीक होणेची ठळक कारणे आहेत. ही समस्या जगभराता वाढत्या प्रमाणावर असल्याने वाळवंट होणारी जमीन पुन्हा सुपीक करणे हे जगातील साऱ्याच देशांसमोरील मोठे आव्हान आहे हे ओळखून राष्ट्रसंघाने जलवायू परिवर्तन, जमिनीचे वाळवंटीकरण, वनक्षेत्रात वाढ यासारख्या विषयांवर जागतिक परिषदा घेण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com