जागतिक कापूस उत्पादन २७६ लाख टन होणार

कापूस
कापूस

मुंबई: अलीकडच्या काही वर्षांत जागतिक कापूस उत्पादकतेत वाढ झाली आहे. परिणामी, २०१९-२० च्या हंगामात जागतिक कापूस उत्पादनात सहा टक्क्यांनी वाढ होऊन २७६ लाख टन होईल. २०१८-१९ मध्ये कापूस उत्पादन २६० लाख टनांवर स्थिरावरणा आहे, असा अंदाज आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने वर्तविला आहे. आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने नुकताच अहवाल सादर केला आहे. त्यात जागतिक कापूस उत्पादन, वापर आणि दराविषयीचे विश्‍लेषण केले आहे. अहवालात म्हटले आहे, की जागतिक कापूस उत्पादकतेत वाढ झाल्याने येणाऱ्या २०१९-२० च्या हंगामात कापूस उत्पादनात सहा टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादन २७६ लाख टन उत्पादन होईल. २०१८-१९ च्या हंगामात २६० लाख टन उत्पादन झाले होते आणि जागतिक कापूस वापर २६८.७ लाख टन झाला होता. २०१९-२० च्या हंगामात कापूसवापर २७३ लाख टन राहणार आहे. ‘‘व्यापारातील अनिश्‍चितता, धीमी आर्थिक वाढ आणि कमी मागणी यांसारखे सतत अडथळे असूनही कापूसवापर आतापर्यंतचा विक्रमी राहण्याची शक्यता आहे,’’ असेही समितीने म्हटले आहे. ‘‘पुढील हंगामात जागतिक कापूससाठा २०१८-१९ च्या १७६.४ लाख टनांच्या तुलनेत काहीसा वाढून १७७ लाख टन राहणार राहील. तसेच कॉटलूक इंडेक्सनुसार जागितक पातळीवर२०१९-२० च्या हंगामात दर कमी राहतील.  कापसाचे दर ८१.२५ सेंटवर बाजार राहिल. २०१८-१९ मध्ये बाजार ८७ सेंटवर राहील,’’ असे आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने म्हटले आहे. भारतात उत्पादन वाढणार भारतात २०१९-२० च्या हंगामात २०१८-१९ च्या तुलनेत उत्पादन तीन टक्क्यांनी वाढून ६१.३ लाख टन राहील, असा अंदाज कॉटन आऊटलूकने व्यक्त केला आहे. २०१८-१९ च्या हंगामात ५९.५ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. देशाच्या एकूण उत्पादनात गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा वाटा ५५ टक्के आहे. तर, ग्रीस आणि टर्की या देशांमध्ये उत्पादनात वाढ होऊन जागतिक कापूस उत्पादन २७२.२ लाख टन राहील आणि जागतिक कापूसवापर २६६.७ लाख टन होईल, तर कापूससाठा ५.८५ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज कॉटन आऊटलूकने व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com