agriculture news in Marathi, world cotton production will reduce, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

जागतिक कापूस उत्पादनात घट होणार

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 मार्च 2018

मुंबई  ः जागतिक कापूस उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज अमेरिकेतील कॉटन आऊटलुकने व्यक्त केला आहे. जागतिक कापूस उत्पादन २०१८-१९ या वर्षात घटून २६.१३ दशलक्ष टन होईल. २०१७-१८ च्या हंगामात जागतिक कापूस उत्पादन २६.१८ दशलक्ष टन झाले होते, असे कॉटन आऊटलूकने म्हटले आहे. 

मुंबई  ः जागतिक कापूस उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज अमेरिकेतील कॉटन आऊटलुकने व्यक्त केला आहे. जागतिक कापूस उत्पादन २०१८-१९ या वर्षात घटून २६.१३ दशलक्ष टन होईल. २०१७-१८ च्या हंगामात जागतिक कापूस उत्पादन २६.१८ दशलक्ष टन झाले होते, असे कॉटन आऊटलूकने म्हटले आहे. 

अमेरिकेतील कॉटन आऊटलूकने नुकताच २०१८-१९ या हंगामतील जागतिक कापूस उत्पादनाचा अंदाज नुकताच जाहीर केला. यामध्ये येणाऱ्या हंगामात जागतिक कापूस उत्पादन घटणार आहे. पुढील हंगामात कापूस लागवड वाढेल पण उत्पादकता ही २०१७-१८ मधील उत्पादकतेपेक्षा कमीच राहिल. तसेच जगातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक भारतातील कापूस उत्पादनात साधारण वाढ होण्याचा अंदाज आहे. अमेरिकेतील कापूस उत्पादनात मागील हंगामातील उत्पादनापेक्षा ४.५१ दशलक्ष टन कमी उत्पादन होणार आहे, असे अहवालात म्हटले आहे.

चीन हा जगात सर्वांत जास्त कापूस उपभोक्ता देश आहे. २०१८-१९ च्या हंगामात चीनमध्ये कापूस उत्पादनात ५.३७ दशलक्ष टनांपर्यंत घट येणार आहे. चीन सरकारने देशातील सुत उद्योगाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा जास्त फायदा झिंजिआंग प्रांतातील गिरण्यांना होणार आहे. त्यामुळे येथील सुत गिरण्यांची कापसासाठीची मागणी वाढून जास्त कापूस उपभोग होईल. या वाढत्या मागणीने कापूस मागणीत २०१८-१९ मध्ये जवळपास ८.८ दशलक्ष टन कापसाची मागणी वाढेल, असेही अहवालात म्हटले आहे.

२०१७-१८ च्या हंगामात चीनमध्ये नियोजन चुकल्याने उत्पादन घटले आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी चीनने साठ्यातील कापूस वापरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या २०१८-१९ च्या हंगामात चीनची मागणी वाढेल साठाही कमी होईल. जागतिक साठाही २०१८-१९ मध्ये ५ लाख ८३ हजार टनांपर्यंत कमी होईल, असे अहवालात म्हटले आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात भारताला संधी?
अमेरिकेतील कॅाटन आऊटलुकने जाहीर केलेल्या अहवालात भारतात कापूस उत्पादन वाढ होणार असल्याचे म्हटले आहे. त्यातच सर्वात मोठ्या उपभाेक्त्या चीनमध्ये उत्पादन घटणार आहे आणि येथील सुत गिरण्यांची कापसाची मागणी वाढणार आहे. त्यातच चीनचा संरक्षित साठाही यंदा कमी झाला असून चीन भारत आणि बांगलादेशाकडून कापूस आयात करत आहे. तसेच अमेरिकेतील कापूस उत्पादनातही घट होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात भारताला जास्त कापूस निर्यातीची संधी असणार आहे, असे बाजार विश्लेषकांनी म्हटले आहे.


इतर अॅग्रो विशेष
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...
दराबाबतचा दुटप्पीपणा घाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर...
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...