agriculture news in marathi, world Food India 2017 starts in Delhi | Agrowon

‘वर्ल्ड फूड इंडया २०१७’ प्रदर्शन क्षणचित्रे

शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान वर्ल्ड फूड इंडिया २०१७ प्रदर्शन अाणि परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जगभरातील अन्न प्रक्रिया उद्योग, गुंतवणूकदार, तज्ज्ञ सहभागी झाले अाहेत. अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये गुंतवणूक अाणि व्यापार वाढविण्याच्या उद्देशाने वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शनाचे अायोजन करण्यात अाले अाहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन आज (ता.३) झाले अाहे. 

तीन दिवसांच्या या प्रदर्शनात भारतासह २० देश सहभागी होत अाहेत. दोन हजारांहून अधिक प्रतिनिधींचा समावेश राहणार अाहे. विज्ञान भवनामध्ये अायोजित परिषदेत नऊ चर्चासत्रे होणार अाहेत. एक देश, एक अन्न कायदा, फळे, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, मत्स्योद्योग या क्षेत्रातील संधी, भारतातील पारंपरिक अन्न पदार्थांचे जागतिकीकरण अादी विषयांवरील चर्चासत्रात तज्ज्ञ मार्गदर्शन करणार अाहेत.

वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शन
ठिकाण ः सी- हेक्सागन पार्क, इंडिया गेट, नवी दिल्ली
वर्ल्ड फूड इंडिया परिषद
ठिकाण ः विज्ञान भवन, नवी दिल्ली
प्रदर्शन, परिषदेविषयी अधिक माहिती ः https://www. worldfoodindia.in/ यावर उपलब्ध अाहे.
परिषदेतील प्रमुख वक्ते
इर्विन सिमॉन, अध्यक्ष, हेन सेलेस्टिअल इंक (अन्न प्रक्रिया उद्योग), न्यूयॉर्क, अमेरिका, कीम फाऊसिंग, अध्यक्ष, डनफॉस (शीतगृह साखळी उद्योग), डेनमार्क, युसूफ अली, अध्यक्ष, लूलू ग्रूप इंटरनॅशनल, अबूधाबी, पॉल बुल्के, अध्यक्ष, नेस्ले एस. ए. (फूड, बेव्हेरेज कंपनी), केन्नेथ पीटरसन, उपाध्यक्ष क्लालिटी ॲसुरन्स (मीट प्रोसेसर) अमेरिका, एसकेएम श्री शिवकुमार, सरव्यवस्थापक, एसकेएम एग प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट लिमिटेड (पोल्ट्री- एग प्रोसेसिंग).

छायाचित्रे : आदिनाथ चव्हाण