जागतिक अन्न कार्यक्रमाला यंदाचा शांततेचा ‘नोबेल’

गेल्या वर्षी ८८ देशांतील दहा कोटी लोकांपर्यंत अन्नधान्य पोचविणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ‘जागतिक अन्न कार्यक्रमाला’ (डब्ल्यूएफपी) या वर्षीचे शांततेसाठीचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे.
wfp
wfp

ओस्लो ः गेल्या वर्षी ८८ देशांतील दहा कोटी लोकांपर्यंत अन्नधान्य पोचविणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ‘जागतिक अन्न कार्यक्रमाला’ (डब्ल्यूएफपी) या वर्षीचे शांततेसाठीचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे. जगभरामध्ये तवाणपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांमध्ये अन्न पुरवठा करण्याचे आणि तेथे शांततेसाठी ‘डब्ल्यूएफपी’ काम करते.  नोबेल पुरस्कार समितीचे अध्यक्ष बेरीट रेईस-अंडरसन यांनी या वर्षीच्या शांतता पुरस्काराची घोषणा केली. जगभरातील भुकेल्यांपर्यंत अन्नधान्य पोचविण्याचे आणि त्यांच्यापर्यंत अन्न सुरक्षा पोचविण्याचे काम जागतिक अन्न कार्यक्रमाने केले आहे. कोरोनाच्या काळात या संस्थेचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे विविध देशांच्या सरकारांनी आणि वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांनी भुकेल्यांपर्यंत अन्न पोचविणाऱ्या जागतिक अन्न कार्यक्रमासारख्या संस्थांना आर्थिक मदत केली पाहिजे, असे मत असे नोबेल पुरस्कार समितीने पुरस्काराची घोषणा करताना म्हटले आहे.  यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी ३१८ शिफारशी आल्या होत्या त्यात २११ व्यक्ती आणि १०७ संस्थांचा समावेश होता. शिफारस झालेली नावे पुढील ५० वर्ष गोपनीय ठेवण्यात येतात. त्यामुळे त्यांची नेमकी माहिती उपलब्ध होत नाही. परंतु, या पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, हाँगकाँगमधील बुद्धिजीवी इलहाम तोहती, पर्यावरणवादी राओनी मेटुकतिरे यांच्याशिवाय ज्युलिअन असांज, एडवर्ड स्नोडेन आणि चेल्सी मॅनिंग यांचीही शिफारस करण्यात आली होती, असे समजते.  पर्यावरणविषयक जागृती करणारी किशोरी ग्रेटा थनबर्ग, अफगाणिस्तानातील शांतता चर्चेला आकार देणाऱ्या फौजिया कुफी, संयुक्त राष्ट्रे आणि त्यांचे सरचिटणीस अंटोनिओ गुटेरेस, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि सुदानमधील क्रांतीचे प्रणेते अला सलाह हेही यावर्षीच्या शांतता पुरस्काराच्या शर्यतीत होते. 

जगभरामध्ये तवाणपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांमध्ये अन्न पुरवठा करण्याचे आणि तेथे शांततेसाठी काम करणाऱ्या डब्ल्यूएफपीच्या नावाची घोषणा नॉर्वेतील ऑस्लो येथील समिती केली आहे. १९०१ पासून शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यास सुरूवात झाली व ते नॉर्वे संसदेने नेमलेल्या समितीच्या निवडीनुसार दिले जात आहे. कोणीही उपाशी झोपू नये म्हणजेच झीरो हंगर या मोहिमेसाठी ‘डब्ल्यूएफपी’ मागील पाच दशकांहून अधिक काळापासून जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये काम करत आहे.

भूकेवरुद्ध ‘डब्ल्यूएफपी’ने सुरु केलेल्या लढाईसाठी, तणाव आणि अशांतता असणाऱ्या प्रदेशांमध्ये शांततेसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना आणि भूक हे वाद आणि संघर्षाचे कारण होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात केलेल्या कामासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे, असे समितीने स्पष्ट केले. 

काय आहे ‘डब्ल्यूएफपी’? जागतिक अन्न कार्यक्रम (डब्ल्यूएफपी) या संयुक्त राष्ट्र संघांच्या उपसंस्थेची स्थापना १९६३ साली झाली. तेव्हापासून ही संस्था ८३ देशांमधील ९१ लाख व्यक्तींना अन्न सुरक्षा पोचविण्याचे करते. ‘डब्ल्यूएफपी’चे मुख्यालय इटलीमधील रोम शहरात असून जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये शाखा आहेत. जगातील जे लोक अन्नधान्य उत्पादन घेऊ शकत नाही किंवा विकत घेऊ शकत नाही अशा गरजूंना ‘डब्ल्यूएफपी’ अन्नधान्य पुरवते. नाजझेरिया, सुदान, काँगो, येमेन यासारख्या अस्थिरता असणाऱ्या देशांमध्ये ‘डब्ल्यूएफपी’ने मोठे काम केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com