राज्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या घटत असताना आठ-पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत म
अॅग्रोमनी
जागतिक मका उत्पादनात घट
जागतिक मका उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) जाहीर केला आहे.
वॉशिंग्टन ः जागतिक मका उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) जाहीर केला आहे. जागतिक मकासाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.१ दशलक्ष टनाने कमी होऊन २८३.८ दशलक्ष टनांवर आला असून, अनेक देशांतील आवक ठप्प आहे, असे ‘यूएसडीए’ने अहवालात म्हटले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात मका दर गेल्या वर्षीच्या तुलनेत तेजीत आहेत.
जागतिक पातळीवर मका उत्पादनात घट होणार असल्याचे ‘यूएसडीए’ने म्हटले आहे. अर्जेटिनात मका उत्पादक महत्त्वाच्या पट्ट्यात डिसेंबर महिन्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे हंगामात प्रारंभी लागवड झालेल्या मका पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्राझीलमध्येही मका पट्ट्यात दुष्काळी स्थिती असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. भारत आणि चीनमध्ये मका उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अनेक देशांची आयात ठप्प
जागतिक मका व्यापाराची वृत्ती यंदा बदलली आहे. युरोपियन देश, कॅनडा, मेक्सिको, इराण व्हिएतनाम, कोलंबिया, चिली, इजिप्त, मलेशिया, पेरू आणि सौदी अरेबिया या देशांनी आयात कमी केली आहे. त्यामुळे मका व्यापार आतापर्यंत दबावात होता. मात्र कोरोनानंतर ज्या देशांत परिस्थिती पूर्वपदावर येत आहे तेथील आयात-निर्यात सुरू होण्यास हालचाली सुरू झाल्या आहेत.
काय आहे अमेरिकेतील स्थिती?
तर अमेरिकेत मका उत्पादन १४ हजार १८२ बुशेल होण्याचा अंदाज होता. मात्र मका लागवडीत झालेली घट आणि उत्पादकतेतील घट यामुळे उत्पादनात ३२४ दशलक्ष टनांनी घटण्याची शक्यता आहे. तसेच इथेनॉलसाठी मक्याचा वापर, पशुखाद्य आणि देशांतर्गत वापर घटणार आहे. अमेरिकेतील मका वापर २५० दशलक्ष बुशेल्सनी कमी होऊन १४ हजार ५७५ बुशेल्स राहण्याचा अंदाज आहे. मका निर्यात मालाचा कमी पुरवठा आणि दरवाढीच्या शक्यतेने १०० दशलक्ष टनांनी घटण्याची शक्यता आहे. पशुखाद्य वापरासाठी मका मागणी ५० दशलक्ष बुशेल्सने कमी होऊन ५ हजार ६५० बुशेल्स राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील मकासाठा १५० बुशेल्सनी कमी होऊन १ हजार ५५२ दशलक्ष बुशेल्स राहण्याची शक्यता आहे. तर शेतकऱ्यांना मिळणारा दर यंदा वाढून ४.२० डॉलर प्रतिबुशेल राहण्याचा अंदाज, ‘यूएसडीए’ने व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात दर तेजीत
आंतरराष्ट्रीय बाजारात ‘सीबॉट’वर मक्याचे दर यंदा तेजीत आहेत. बुधवारी (ता.२०) मका ५२१ डॉलर प्रतिबुशेल्सवर होता. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मक्याचे ‘सीबॉट’वरील सरासरी दर हे ३४० ते ३४१ डॉलर प्रतिबुशेल्सदरम्यान होते. यंदा दरात सरासरी ३४ टक्क्यांनी वाढले आहेत.
मक्याची स्थिती
- जागतिक साठ्यात घट
- अमेरिकेतील उत्पादनात घटीचा अंदाज
- अर्जेंटिना, ब्राझीलमध्ये उत्पादकता घटली
- भारत, चीनमध्ये उत्पादनात वाढीचा अंदाज
- अमेरिकेतील वापर घटला
- जागतिक आवक ठप्प
- आंतरराष्ट्रीय बाजारात मका दर तेजीत
- 1 of 30
- ››