agriculture news in marathi world waits for Vaccine on corona | Agrowon

जगाला प्रतीक्षा कोरोनावरील लसीची

वृत्तसेवा
गुरुवार, 16 एप्रिल 2020

 कोविड-१९च्या विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी त्यावर लस शोधण्याचे प्रयत्न संपूर्ण जगभरात सुरू असले तरी चीन आणि अमेरिकेने त्यात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

वॉशिंग्टन : कोविड-१९च्या विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी त्यावर लस शोधण्याचे प्रयत्न संपूर्ण जगभरात सुरू असले तरी चीन आणि अमेरिकेने त्यात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. या दोन देशांमध्ये कोरोनाच्या विरोधातील तीन वेगवेगळ्या लसी तयार करण्यात आल्या असून, त्यांच्या चाचण्यांचा प्राथमिक टप्पा सध्या सुरू आहे. या देशांतील तीन वेगवेगळ्या कंपन्या सध्या कोरोनाविरोधातील लस निर्मितीच्या प्रक्रियेत आघाडीवर आहेत.

कॅनसायनो बायोलॉजिक्स
चीनमधील कॅनसिनो बायोलॉजिक्सने तयार केलेल्या लसीच्या चाचण्यांचा सध्या दुसरा टप्पा सुरू असल्याची माहिती चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मंगळवारी देण्यात आली. लसींच्या पुढील टप्प्यातील चाचण्या ५०० जणांवर घेण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत २७३ स्वयंसेवकांना ही लस देण्यात आलेली आहे.

एनआयएच आणि मॉडेर्ना
अमेरिकेतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ (एचआयएच) आणि मॉडेर्ना इनकार्पोरेशन या संस्थेनेही कोरोनाच्या विरोधातील लसीच्या निर्मितीमध्ये आघाडी घेतली आहे. या संस्थेने तयार केलेल्या लसीच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. सिएटल येथील रुग्णालयात मागील महिन्यात ही लस ज्या व्यक्तीला प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आली होती त्या व्यक्तीला मंगळवारी या लसीचा दुसरा डोस देण्यात आला.एनआयएचच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. अॅन्थनी फाउसी यांनी सांगितले की, संस्थेने तयार केलेल्या लसीचे चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आत्तापर्यंत तरी कुठलेही नकारात्मक परिणाम दिसून आलेले नाही. या लसीच्या चाचण्यांचा पुढचा टप्पा जूनमध्ये सुरू होण्याची शक्यता असून, त्या चाचण्यांचे स्वरूप मोठे असते. 

इनोव्हो फार्मास्युटीकल्स
या संस्थेने तयार केलेल्या कोरोनाविरोधातील लशीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या सध्या सुरू आहेत. मागील आठवड्यात अमेरिकेत मागील आठवड्यात त्याला सुरवात झाली आहे. दरम्यान, ही कंपनी आपल्या लसीवर चीनमध्येही चाचण्या करण्याच्या तयारीत आहे.

अशी होते चाचणी

  • चाचण्यांच्या पहिल्या टप्प्यात सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
  • वेगवेगळ्या लसीचे वेगवेगळ्या प्रमाणातील डोस दिले जातात
  • पहिल्या टप्प्यात चाचण्या घेण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या मर्यादित स्वरूपात असते
  • चाचण्यांचा दुसरा टप्पा अधिक अवघड, कारण अनेक जणांना ही लस दिली जाते आणि त्यांचा संसर्गापासून बचाव होतो का याचा अभ्यास करण्यात येतो
  • चाचण्यांमधील निष्कर्षांचा आढावा घेतल्यानंतर संशोधनाची पुढील दिशा निश्चित केली जाते

इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...