खानदेेशातील शेतकऱ्यांना कांद्याच्या दराची चिंता

खानदेेशातील शेतकऱ्यांना कांद्याच्या दराची चिंता
खानदेेशातील शेतकऱ्यांना कांद्याच्या दराची चिंता

जळगाव : मागील २० ते २२ दिवसांपासून कांद्याचे दर दबावात आहेत. यंदा कांदा लागवड धुळे व जळगाव जिल्ह्यांत काहीशी वाढली आहे. मात्र अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नुकसानीबाबत चिंता आहे. कांद्याला किमान ३०० व कमाल ६५० रुपये प्रतिक्विंटलचे दर जळगाव, चोपडा येथील बाजारांत आहेत. धुळे येथील बाजारातही ३५० ते ७०० रुपये दर असल्याची माहिती आहे.

धुळे जिल्ह्यात यंदा लागवड काहीशी वाढली. कारण ऑगस्टमध्ये भिज पाऊस होता. नाशिकमधील कसमादे पट्ट्यात रोपे स्वस्तात मिळाली.  २० बाय अडीच ते तीन फुटाच्या रोपांचे वाफे १००० ते १२०० रुपयात मिळाले. कमी कालावधीचे पीक असल्याने शेतकरी मका व इतर पिकांऐवजी कांद्याकडे वळले. परंतु जशी लागवड सुरू झाली तसे दरही कमी होऊ लागले. जळगाव येथील बाजार समितीत या आठवड्यात प्रतिदिन ७०० क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. धुळे येथेही प्रतिदिन ४०० ते ४५० क्विंटल आवक सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या चोपडा तालुक्‍यातील अडावद व यावल तालुक्‍यांतील किनगाव येथेही आवक सुरू आहे. परंतु तेथेही कमाल दर ७०० रुपयांवर नाहीत. चाळीसगाव येथे किरकोळ आवक सुरू आहे. कांदा परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जळगाव व धुळे जिल्ह्यांत मागील वर्षी सुमारे साडेसात हजार हेक्‍टवर कांदा लागवड झाली होती. यंदाची लागवड जवळपास साडेआठ हजार हेक्‍टरपर्यंत आहे. जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्‍यातील डांभुर्णी, किनगाव, साकळी, वड्री, पाडळसे, भालोद, न्हावी भागात लागवड चांगली  आहे. चोपडा तालुक्‍यात पंचक, लोणी, अडावद, धानोरा, गोरगावले, माचले, लासूर व इतर तापी काठावरील गावांमध्ये लागवड झाली आहे. चाळीसगाव, जळगाव, पाचोरा, जामनेर व एरंडोलातही चांगली लागवड आहे. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्‍यातील पिंपळनेर व परिसरात लागवड वाढली आहे. धुळे तालुक्‍यातील लामकानी, कापडणे, न्याहळोद, जापी भागात लागवड आहे. याबरोबरच शिंदखेडा तालुक्‍यात नरडाणा, चिचवार, टाकरखेडा आणि तापी काठावरील गावांमध्ये लागवड आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com