सोलापुरात शेतकऱ्यांचे खाते नंबर चुकले, कांदा अनुदान परत

सोलापुरात शेतकऱ्यांचे खाते नंबर चुकले, कांदा अनुदान परत
सोलापुरात शेतकऱ्यांचे खाते नंबर चुकले, कांदा अनुदान परत

सोलापूर : कांदा दरातील घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेले अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे. परंतु, शेतकऱ्यांनी दिलेल्या बॅंकेचा खातेनंबर आणि ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यासाठी आवश्‍यक असलेला बॅंकेचा आयएफएससी कोड व्यवस्थित न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एक हजार शेतकऱ्यांना हे पैसे अद्याप मिळू शकले नाहीत. सुमारे ८८ लाख ३३ हजार रुपयांचे हे अनुदान केवळ या तांत्रिक चुकीमुळे परत गेले आहे. आता दुरुस्तीनंतर ते पुन्हा जमा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कांद्याच्या घसरत्या दरामुळे पहिल्या टप्प्यात १५ डिसेंबर, त्यानंतर ३१ जानेवारी आणि शेवटच्या टप्प्यात २८ फेब्रुवारीपर्यंत अशा तीन टप्प्यात अनुदान देण्याची मर्यादा वाढवली. आजही ३१ मार्चपर्यंत या योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. अनेक बाजार समित्यामध्ये त्यासाठी अर्ज भरले जात आहेत. शेतकऱ्यांना सर्वाधिक २०० क्विंटलपर्यंत प्रतिक्विंटल २०० रुपये इतके अनुदान देण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील आठ हजार ८३४  शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपयांप्रमाणे आठ कोटी १६ लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी शेतकऱ्यांचे बॅंक खाते नंबर व आयएफएससी कोड आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांनी आयएफसी कोडची माहिती परिपूर्ण न दिल्याने ही रक्कम परत गेली आहे. रक्कम परत गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने ही अपूर्ण यादी त्या- त्या बाजार समित्यांना दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहे. शेतकऱ्यांची परिपूर्ण माहिती मिळाल्यानंतर ही रक्कम पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. ऐन दुष्काळात कांदा उत्पादकांना या अनुदानाचा आधार होण्याची शक्‍यता होती, पण त्यातही आता तांत्रिक अडचण आल्याने काही दिवस हे अनुदान पदरात पडण्यात अडथळा आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com