agriculture news in marathi, wrong paisewari mentioned in report, jalgaon, maharashtra | Agrowon

धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीची
टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

पाऊस अजूनही नाही. परंतु पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे. नंतर सुधारित पैसेवारी येईल. परंतु शासनाला वस्तुस्थिती लक्षात आणून देण्यासाठी पहिली पैसेवारी प्रत्यक्ष पाहणी, शेतकऱ्यांची मते विचारात घेऊनच जाहीर केली पाहिजे.
- किसन लंके, शेतकरी, जळगाव.

जळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा पाऊस यंदा झाला नाही. जूनमध्ये धुळ्यात नुकसानकारक पाऊस झाला. नंतर जुलै व ऑगस्टमध्ये मिळून २५ ते २७ दिवस पावसाचा खंड सर्वत्र राहिला. आता प्रशासन जाहीर करीत असलेली पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे. पाऊस नाही, पिकांची स्थिती नाजूक आहे, पण पैसेवारी अधिक असल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी स्थितीचा लाभ मिळणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दोन्ही जिल्ह्यांमध्ये यंदा ९२ टक्‍क्‍यांपर्यंत पेरणी झाली. शासनाने पेरणी ७५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास दुष्काळी स्थिती असेल, असे म्हटले. नंतर ऑगस्टअखेरपर्यंत पाऊस दोन्ही जिल्ह्यांमध्ये ६१ टक्‍क्‍यांवर झाला. सप्टेंबरमध्ये पाऊस नाही. याच आधारावर प्रशासनाने पैसेवारी दाखविली आहे. जळगाव जिल्ह्याची पैसेवारी ६४ पर्यंत आहे. धुळ्यातही ती ५० पेक्षा अधिक आहे. या सर्व स्थितीत शेतकरी दुष्काळी मदतीला मुकतील. गावांमध्ये टंचाईस्थिती आहे. मूग, उडीद, सोयाबीन, कोरडवाहू कापूस पिके हातची गेल्यात जमा आहेत. ज्वारी व कोरडवाहू कापसाला पावसाची गरज आहे. कूपनलिकांची पाणी पातळी घटली आहे. प्रशासनाने ऑगस्टअखेरचे आकडे घेतले. परंतु सप्टेंबरनंतर पैसेवारी जाहीर करावी. कारण तेव्हा नेमका पाऊस किती झाला, हे स्पष्ट होते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मध्यंतरी ऑगस्टमध्ये पाऊस आला, पण तोपर्यंत मूग, उडीद ही पिके हातची गेली होती. नंतर पाऊस आला त्याचा किरकोळ लाभ कापूस पिकाला झाला. सोयाबीन, कोरडवाहू कापसाला पाते लागत असताना पावसाने दडी मारली आहे. प्रशासनाने महसूल मंडळांमधील नेमकी पावसाची स्थिती, पिके कशी आहेत, हे न पाहताच निर्णय घेतल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
लोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली...शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...
जळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...
केंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...
फळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...
सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...
अमरावती जिल्ह्याला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...
परभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...
हमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...
राज्यात रताळी ५०० ते ६००० हजार रुपये...जळगावात २२०० ते ३२०० रुपये  जळगाव...
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...