शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अंमल होईपर्यंत लढा : यशवंत सिन्हा

कासोधा परिषदेत यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, संजय सिंग, अाशीष देशमुख आदी.
कासोधा परिषदेत यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, संजय सिंग, अाशीष देशमुख आदी.

अकोला ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मागील परिषदेनंतर झालेल्या आंदोलनाला शासनाने लेखी मान्य करीत तोडगा काढला. मात्र त्यानंतर अंमल केला नाही. अाता मागण्या मान्यच नाहीत, तर त्यावर अंमल सुरू होईपर्यंत अाम्ही थांबणार नाही, असा इशारा देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला. येथे मंगळवारी (ता. २३) अायोजित दुसऱ्या कापूस-सोयाबीन-धान (कासोधा) परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यशवंत सिन्हा यांनी गेल्या वेळी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याचा तो अानंद होता. मात्र जवळपास दहा महिने लोटले तरी त्यावर काहीही अंमलबजावणी झाली नाही. सरकारने फसविले. अाता हा लढा थांबणार नाही, असे सांगितले. जागर मंचाने अायोजित केलेल्या या दुसऱ्या ‘कासोधा’ परिषदेला सिने अभिनेता तथा खासदार शत्रुघ्न सिन्हा, खासदार संजय सिंग, समाजवादी पक्षाचे नेता घनश्यान तिवारी, गुजरातचे माजीमंत्री प्रवीणसिंह जडेजा, अब्दुल फारुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शर्वरी तुपकर, अापच्या नेत्या प्रीती मेनन, अामदार अाशीष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. शत्रुघ्न सिन्हा यांनी शेतकऱ्यांनी अापल्या मागण्यांसाठी एकत्र येण्याचे अावाहन केले.  खासदार सिंग म्हणाले, की २०१४ मध्ये देशाला मोदींनी अाणि राज्याला फडणवीस यांनी फसविले. यांनी अाश्वासन देऊनही स्वामिनाथन अायोग लागू केला नाही. शेतीमालाला भाव, थकलेले पैसे मागणाऱ्या शेतकऱ्यांवर मध्य प्रदेशात गोळीबार, तमिळनाडूत आंदोलन चिरडले तर दिल्लीत अहिंसादिनी अश्रुधुराचे नळकांडे फोडले.  माजी मंत्री जडेजा यांनी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना व अाता देशाचे पंतप्रधान असताना कसे खोटे बोलतात याबाबत सविस्तर सांगितले. आशीष देशमुख यांनीही सरकारवर हल्ला करीत केंद्र व राज्याने शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचे सांगितले. प्रीती मेनन यांनी मुख्यमंत्री फडणवीस सरकार फसवे असल्याचे सांगत स्थानिक खासदार संजय धोत्रे यांच्यावरही टीका केली. खासदार असताना त्यांना राज्यमंत्री दर्जा देऊन सरकारने संविधानविरोधी काम केल्याचे म्हटले. शर्वरी तुपकर यांनी राज्यात शेतकरी अात्महत्या होत असून, सरकार सर्वच स्तरांवर अपयशी ठरल्याचे सांगितले. जागर मंचाचे संयोजक प्रशांत गावंडे यांनी परिषदेत ठराव वाचन केले. 

कासोधा परिषदेने मंजूर केलेले ठराव

  • सर्व शेतीमालासाठी भावंतर योजना तत्काळ लागू करावी.   
  • उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दुष्काळी अनुदान प्रतिहेक्‍टरी सहा हजार आठशे रुपये वितरित करावे. 
  • सोनेतारण कर्जमाफीतील जाचक अटी दूर कराव्यात.  
  • सर्व शेतीमाल खरेदीसाठी एकराचा निकष दूर करून शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला सर्व शेतीमालविना अट खरेदी करावा
  • सर्व शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये प्रतिएकराप्रमाणे पीककर्ज देण्यात यावे
  • शेती अवजारे खरेदीसाठी चार टक्के दराने कर्ज व जीएसटी रद्द करावा  
  • वन्यप्राण्यांपासून शेतीला संरक्षण देऊन प्राण्यांना जंगलामध्ये नेण्याची व्यवस्था करावी
  • कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांवर निश्चित करणारे १२ ऑक्टोबर २०१७ चे शासन परिपत्रक मागे घ्यावे.  
  • अकोला जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यात यावे  पंदेकृविच्या ताब्यातील पडीक जमीन शेतकऱ्यांना द्यावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com