यवतमाळ जिल्हा बॅंकेची १२ वर्षांनंतर होणार निवडणूक

Yavatmal District Bank Election to be held after 13 years
Yavatmal District Bank Election to be held after 13 years

यवतमाळ ः गेल्या बारा वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीला अखेर २६ मार्चचा मुहूर्त मिळाला आहे. त्याकरिता शुक्रवारी (ता. १७) कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, १५ फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. 

विविध कारणांमुळे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे गेल्या बारा वर्षांपासून एकच संचालक मंडळ बॅंकेत तळ ठोकून होते. या संचालक मंडळाला बदलण्यासाठीच्या प्रक्रियेअंतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी हा कार्यक्रम विभागीय सहनिबंधकांना पाठविला. त्यानुसार २६ मार्च रोजी मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ मार्चपूर्वी निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याने निवडणूक प्राधिकरणाने लगबगीने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. विद्यमान उपविधीनुसार ही निवडणूक घेतली जाणार आहे.  १३ संचालक तालुका गटातून, पाच आरक्षणाच्या जागेतून तर तीन जिल्हा गटातून निवडले जाणार आहेत. 

जिल्हा गटातच सर्वाधिक गर्दी होण्याची शक्‍यता आहे. संचालकांची संख्या २८ वरून २१ वर आणण्यात आल्याने विद्यमान अनेक संचालकांचे मतदार संघच बाद झाले आहे. विद्यमानपैकी नव्या संचालक मंडळात कोण पुन्हा निवडून येतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम
नामांकन २५ ते २९ फेब्रुवारी
छाननी २ मार्च
वैध यादी प्रसिद्धी ३ मार्च
नामांकन मागे ३ ते १७ मार्च
उमेदवार अंतिम यादी १८ मार्च
मतदान दिवस २६ मार्च
मतमोजणी २८ मार्च

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com