मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
बातम्या
यवतमाळ जिल्ह्यात अखेर दुष्काळ जाहीर
यवतमाळ : यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने शेती उत्पन्नात घट झाली. जिल्ह्याची नजरअंदाज, सुधारित पैसेवारी ५०च्यावर होती. परिणामी, दुष्काळ जाहीर होणार की नाही, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. रविवारी (ता. ३१) खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर झाली. जिल्ह्यातील दोन हजार १५८ हजार गावांपैकी तब्बल दोन हजार ४९ गावांची पैसेवारी ४७ निघाली. अंतिम पैसेवारीत जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. पावसाच्या लहरीपणाचा फटका पिकांना बसला. असे असतानाही सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी ६३ पैसे निघाली. पिकांची स्थिती उत्तम नसताना प्रशासनाने जाहीर केलेल्या नजरअंदाजाबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. राजकीय पक्षांनीही याबाबत आवाज बुलंद केला. त्यानंतर सुधारित पैसेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
गेल्या ३१ ऑक्टोबरला सुधारित पैसेवारी ५७ पैसे दाखविण्यात आली. ५० टक्यांच्यावर पैसेवारी असल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृशस्थिती असतानाही मदतची शक्यता नव्हती. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, वस्तुस्थितिदर्शक पैसेवारी जाहीर करण्यात यावी, असा दबाव राजकीय पक्ष, शेतकरी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी टाकला. त्यात शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचा सर्वाधिक पुढाकार राहिला.
दोन दिवसांपूर्वीच पैसेवारीवरून शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने पालकमंत्री व महसूल राज्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यांनतर आज ४७ पैसे पैसेवारी जाहीर करण्यात आली. पैसेवारीत घोळ घालण्याचे काम प्रशासनाने यापूर्वी केले आहे. मात्र, यंदा वेळीच संघटनांनी टाकलेला दबाब कामी आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अंतिम ४७ पैसे पैसेवारीवर मोहर उमटल्याने आता मदतीकडे लक्ष लागले आहे.
या सुविधा मिळणार
- शेतसाराला स्थगिती
- कृषिवीज बिलात ३३.५० टक्केसूट
- कर्जवसुली स्थगिती
- कर्जाचे पुनर्गठन
- शैक्षणिक परीक्षा शुल्कात माफी