यवतमाळला होणार कृषी निविष्ठा चाचणी प्रयोगशाळा ः पालकमंत्री राठोड

यवतमाळ ः लागवड क्षेत्रानुसार उत्पादकता वाढीसाठी कृषी निविष्ठांची नमुने तपासणी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. हे लक्षात घेता कृषी निविष्ठा नमुने तपासणी प्रयोगशाळा यवतमाळमध्ये उभारण्यात येईल. त्याकरिताच आराखडा तयार करावा. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन वनमंत्री तसेच पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
Yavatmal to have agricultural inputs test laboratory: Guardian Minister Rathore

जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या वतीने नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, खासदार बाळू धानोरकर, खासदार हेमंत पाटील, विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग, दुष्यंत चतुर्वेदी, संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, विभागीय  कृषी सहसंचालक सुभाष नागरे, अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर उपस्थित होते. 

संजय राठोड म्हणाले की, जिल्ह्यात ९५ टक्‍के शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे पिकांची उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे. जिल्ह्यात बियाणे, खतांचा रॅक पॉईंट वाढवा. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ बहुतांशी शेतकऱ्यांना द्या. शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर हेल्पलाईन क्रमांक व तक्रार निवारण केंद्र सुरू करा.  

यवतमाळ जिल्ह्यात चालू वर्षात १५ हजार शेततळे व ८० टक्‍के पीककर्ज वाटपाचे नियोजन आहे. गेल्या दहा दिवसांत ३८५२ शेतकऱ्यांना ३५ कोटीचे कर्जवाटप झाले आहे. पुढील आठवड्यापर्यंत हा आकडा १०० कोटींवर जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com