Agriculture news in marathi in Yawal, Raver american fall army warm on the Maize crop | Agrowon

यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी, चिंचोली परिसरात मका पिंकावर लष्करी अळीचा मोठा प्रार्दुभाव दिसून येत आहे.

जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी, चिंचोली परिसरात मका पिंकावर लष्करी अळीचा मोठा प्रार्दुभाव दिसून येत आहे. कृषी विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. शेतकऱ्यांमध्ये उपाययोजना काय करायच्या, याबाबत संभ्रम आहे. अशा परिस्थितीत कृषी सहायकाकडून मार्गदर्शनाची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

रावेरमध्येही अनेक भागात ही अळी दिसून आली आहे. चिंचोली परिसरात आधीच कोरोनाच्या आजाराने शेतकरी हैराण आहेत. कोणत्याही शेतीमालाला समाधानकारक भाव नाही. मजूर मिळत नाहीत. मका, ज्वारीची मोठी लागवड व पेरणी  करण्यात आली आहे. पंरतु, मका पिकावर मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीचा प्रार्दुभाव दिसत आहे.

अळी पिके फस्त करीत आहे. पोंग्यातील पाने कुरतडत आहे. पिकाची वाढ खुंटली आहे. किडनाशके महाग आहेत. कोणती किडनाशके फवारायची, याबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळत नाही. शेतीशाळा घेणे बंधनकारक आहे. परंतु, मार्गदर्शन झालेले नाही.

चाऱ्यासाठी अनेकांकडून मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. परंतु, अशीच स्थिती राहिली, तर चाराही मिळणार नाही. उत्पादन हाती येणार नाही. शेतकरी कर्जबाजारी होतील. यामुळे यासंदर्भात सर्वेक्षणही तातडीने हाती घेण्याची गरज आहे.
 


इतर बातम्या
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
आदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील...कर्जत, जि. रायगड : आदिवासींच्या उत्कर्षासाठी...