वर्ष २०२० ठरले सर्वाधिक उष्ण

गेले २०२० हे वर्ष भारतासाठी मागील १२० वर्षांमधील आठवे सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून समोर आले आहे. तरीही सलग चौथ्या वर्षी देशातील तापमानवाढीचे आकडे जागतिक सरासरीपेक्षा कमी असल्याचे नोंदविले गेले आहे.
The year 2020 became the hottest
The year 2020 became the hottest

पुणे : गेले २०२० हे वर्ष भारतासाठी मागील १२० वर्षांमधील आठवे सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून समोर आले आहे. तरीही सलग चौथ्या वर्षी देशातील तापमानवाढीचे आकडे जागतिक सरासरीपेक्षा कमी असल्याचे नोंदविले गेले आहे. २०२० मध्ये जगभरात १९८१ ते २०१० या कालावधीतील सरासरी तापमानवाढ नोंदविली गेली. भारतात मात्र, सरासरीपेक्षा ०.२९ अंश सेल्सिअस जास्त तापमानाची नोंद झाली असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २००१ ते २०१० या दशकात देशात सरासरीपेक्षा ०.२३ अंश सेल्सिअस, तर सरत्या २०११ ते २०२० या दशकात सरासरीपेक्षा ०.३४ अंश सेल्सिअस अधिक तापमान नोंदवले गेले. भारतासाठी २०२० चे दशक सर्वाधिक उष्ण ठरले. या दशकामध्येही सर्वाधिक ०.७१ अंश सेल्सिअस तापमान वाढ २०१६ मध्ये नोंदवली गेली. त्यानंतर दर वर्षी तापमानातील वार्षिक सरासरी वाढ कमी झाल्याचे दिसून येते. गेल्या २०२० या वर्षी भूपृष्टाजवळील कमाल किमान तापमानाची मध्यम सरासरीपेक्षा ०.३९ अंश सेल्सिअसने जास्त नोंदवली गेली. यंदा त्यात आणखी घट होऊन ती ०.२९ अंश इतकी कमी झाली होती.

देशात मॉन्सून काळात सरासरीपेक्षा ०.४३ अंश, तर मॉन्सूनोत्तर काळात ०.५३ अंश सेल्सिअस जास्त तापमान नोंदले गेले.  हिवाळ्यातील तापमान ०.१४ अंश सेल्सिअस अधिक होते. मात्र, २०२० च्या उन्हाळ्यात देशात सरासरीपेक्षा ०.०३ अंश सेल्सिअस कमी तापमानाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा ०.७२ अंश सेल्सिअस जास्त तापमान नोंदले गेले. हे सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले. ऑगस्टमध्ये ०.५८ अंश (दुसरे सर्वाधिक), ऑक्टोबर ०.९४ (तिसरे सर्वाधिक), तर डिसेंबरमध्ये ०.३९ (सातवे सर्वाधिक) अंश सेल्सिअस जास्त तापमान नोंदले गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चक्रीवादळाचा धुमाकूळ गेल्या २०२० वर्षात  अम्फान, निवार, बुरेवी अशी एकामागून एक अशी चक्रीवादळे तयार झाली होती. याशिवाय अरबी समुद्रामध्येही निसर्ग आणि गती अशी चक्रीवादळे तयार झाली होती. तर जवळपास १२ कमी दाबाचे क्षेत्र तयार तयार झाले होती. यामध्ये एक मोठे चक्रिय वादळाची स्थिती असलेले, सहा मध्य स्वरूपाचे तर पाच कमी तीव्र क्षमतेचे दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. यामुळे देशातील अनेक भागात कमीअधिक स्वरूपात चांगला पाऊस झाल्याची नोंदही हवामान विभागाकडे झाली आहे.

देशात सर्वसाधारण पाऊस देशात २०२० मध्ये देशात वर्षभरात सर्वसाधारण पाऊस पडला. वर्षभरात हा पाऊस सरासरीपेक्षा ११० टक्के अधिक पाऊस पडला. देशातील ३६ विभागातील सौराष्ट्र, कच्छ- रायलसीमा या दोन विभागात सर्वाधिक पाऊस पडला. त्यानंतर दहा विभागात अधिक, तर २२ विभागात सर्वसाधारण आणि दोन विभागात कमी पाऊस पडला असल्याची आकडेवारी नोंदविली गेली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com