agriculture news in marathi, year and half time has spend to get Crop Insurance in Dhule district | Agrowon

दीड वर्षापासून रखडली फळ पीकविम्याची रक्कम
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

धुळे : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून २०१५-१६ मध्ये केळीसंबंधी विमा हप्ता भरलेल्या २२२ शेतकऱ्यांना अजूनही विमा भरपाईची रक्कम मिळालेली नाही. या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे नुकतीच तक्रार केली आहे. 

धुळे : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून २०१५-१६ मध्ये केळीसंबंधी विमा हप्ता भरलेल्या २२२ शेतकऱ्यांना अजूनही विमा भरपाईची रक्कम मिळालेली नाही. या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे नुकतीच तक्रार केली आहे. 

शिरपूर तालुक्‍यातील होळनांथे महसूल मंडळांतर्गत असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांनी केळीसंबंधी विमा हप्ता एका राष्ट्रीयीकृत बॅंकेकडे भरला होता. नंतर कमी तापमानाबाबत शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम जाहीर झाली. एकूण २९ लाख रुपये रक्कम मंजूर झाली. हेक्‍टरी ९१०० रुपये, अशी रक्कम शेतकऱ्यांना देय असल्याचे विमा कंपनीने म्हटले होते, परंतु दीड वर्ष झाले तरी ही रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नाही. शेतकरी बॅंकेकडे गेल्यास त्यांना धुळे येथील बॅंक मुख्यालयात चौकशीसाठी पाठविले जाते. मुख्य शाखेकडून विमा कंपनीला विचारा, अशी उत्तरे दिली जातात. 

धुळे ते होळनांथे हे अंतर सुमारे ६० किलोमीटर आहे. एवढे अंतर दुचाकी किंवा एसटी बसने पार करून शेतकरी चकरा मारत आहेत, परंतु त्यांची दखल घेतली जात नाही. यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासन व बॅंकेच्या मुख्यालयास एक निवेदन दिले. केळी उत्पादकांना अपेक्षित दर मागील वर्षी मिळाले नाहीत. त्यातच विमा हप्त्यासंबंधीची भरपाईदेखील न मिळाल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.

विमा हप्ता हेक्‍टरी सहा हजार रुपये एवढा भरला होता. भरपाई फक्त ९१०० रुपये मिळाली. हा प्रकारही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा आहे. कमी तापमानात केळीचे ५० टक्के नुकसान झाले होते. तसेच केळीचा दर्जा घसरून तिची कमी दरात विक्री करावी लागली होती. आता भरपाईसाठी शेतकऱ्यांना बॅंका व प्रशासनाकडे चकरा माराव्या लागत असल्याने असंतोषाची भावना निर्माण झाली आहे, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. निवेदन देताना अॅड. प्रकाश पाटील व इतर शेतकरी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...