Agriculture News in Marathi This year, cotton will continue to rise | Page 2 ||| Agrowon

यंदा कापूस तेजीतच राहणार

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात सप्टेंबर महिन्यात झालेला पाऊस तसेच अनेक राज्यांत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने देशात यंदा कापूस उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. 

पुणे : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात सप्टेंबर महिन्यात झालेला पाऊस तसेच अनेक राज्यांत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने देशात यंदा कापूस उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. तसेच जागतिक पातळीवर कापसाची मागणी वाढणार असल्याने दरही तेजीत राहतील, असे जुनागड कृषी विद्यापीठाने कापूस दर अंदाज अहवालात स्पष्ट केले आहे.

 जागतिक व्यापार संघटनेच्या डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स सेलने जाहीर केलेल्या या अहवालात म्हटले आहे, देशात कापूस उत्पादन घटणार आहे. देशात गेल्या वर्षी १३१ लाख हेक्टरवर कापूस लागड होती. यंदा कापूस पट्ट्यात पावसाचा खंड, कमी पाऊस आदी कारणांमुळे लागवड क्षेत्र १२४ लाख हेक्टरवर आले. त्यामुळे कापूस लागवडीत ७ लाख हेक्टरने घट झाली. त्यातच सप्टेंबर महिन्यात पाऊस झाल्याने कापूस उत्पादनात घट येईल, असे अहवालात नमूद आहे.

गुजरातमध्ये यंदा कापूस उत्पादन स्थिर राहील, असे अहवालात म्हटले आहे. गुजरामध्ये गेल्या वर्षी एवढेच, म्हणजेच २२.५६ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली असून, ८०.९५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज सरकारने व्यक्त केला. गेल्या हंगामात ७२.७ लाख गाठी उत्पादन होते. त्यात यंदा ८ लाख गाठींची वाढ सरकारला अपेक्षित आहे. परंतु सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले, सोबतच कापसाच्या पहिल्या वेचणीलाही उशीर झाला. त्यामुळे गुजरातमध्ये यंदा कापूस उत्पादन मागील वर्षी एवढेच राहण्याची शक्यता आहे.

देशातील कापसाच्या दराबाबत जुनागड कृषी विद्यापीठाने म्हटले आहे, यंदा सरकारने लांब धाग्याच्या कापसासाठी ६ हजार २५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र जागितक कापूस वाढल्याने दराला असलेला आधार आणि देशात कापूस उत्पादन घटणार असल्याने दर हमीभावापेक्षा जास्तच राहतील. त्यातही कापूस निर्यातीच्या संधी वाढल्या आणि जागतिक कापूस वापर असाच चांगला राहिला तर पुढील काळात दर आणखी वाढतील.

जागतिक बाजारातही कापूस सुधारेल
यूएसडीएचा दाखला देत अहवालात २०२१-२२ च्या कापूस हंगामात जागतिक उत्पादन १ हजार ५३१ लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या हंगामात १ हजार ४३९ लाख गाठी उत्पादन झाले होते. पण यंदा कापूस वापर वाढण्याची अपेक्षा आहे. यंदा १ हजार ५८८ लाख गाठी कापसाचा जागतिक पातळीवर वापर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा वापर ५७ लाख गाठींनी अधिक असेल. त्यामुळे जागितक कापूस किमत अधिक राहतील, असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया
मागील वर्षी देशातील कापूस उत्पादन ३५४ लाख गाठींवर स्थिरावले होते. सरकारने २०२१-२२ च्या पहिल्या अंदाजात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ अपेक्षित धरून ३६२ लाख गाठी कापूस उत्पादनाची शक्यता वर्तविली आहे. मात्र महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात पावसाने दणका दिल्याने कापसामध्ये बोंडसड, पाते आणि फूल गळ तसेच जास्त दिवस पाण्यात राहिल्याने पिकही सडण्याचे प्रकार घडले. सोबतच गुलाबी बोंड अळीचाही उद्रेक होत आहे. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस उत्पादन घटेल.
-मगनलाल धांधल्या, सहयोगी संशोधन संचालक, 
डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरल इकॉनॉमिक्स


इतर अॅग्रो विशेष
जातिवंत जनावरांसाठी दर्यापूरचा बाजारअमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील जनावरांचा बाजार...
‘त्रिवेणी नॅचरल गुळाला’ राज्यभर बाजारपेठपरभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील डॉ.मोहनराव देशमुख...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या...
बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ...पुणे : अंदमान समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र...
कापसाचे दर काहीसे स्थिरावलेपुणे ः वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बाजारात...
मुसळधार पावसाने दाणादाण पुणे ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम...
फळपीक विमा योजनेवर बहिष्काराचा निर्णयअमरावती ः आंबिया बहर फळपीक विमा योजनेच्या...
द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्याने...नाशिक : प्रतिकूल परिस्थितीत प्रयोगशीलतेने...
देशांतर्गत बाजारात साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी...
ऊस वाहतूकदरासाठी हवाई अंतराचा निकष लावापुणे ः दोन साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा...
कोल्हापुरात ऊसतोडणी थांबलीकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
जलसंधारणाचा ‘हायवे’ पॅटर्नलातूर ः मराठवाड्यात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन...
जलसंधारण, शाश्‍वत तंत्राद्वारे...मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) या गावासह...
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
सोयाबीन, कापसावर संसदेत चर्चा व्हावीसोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...