तुलनेत यंदा दुपटीने गाळप

गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात दुपटीने ऊसगाळप झाले आहे. यंदा २२ एप्रिलअखेर तब्बल १००१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ५३५ लाख टन उसाचे गाळप झाले होते.
 तुलनेत यंदा दुपटीने गाळप This year, the crushing of sugarcane has doubled
तुलनेत यंदा दुपटीने गाळप This year, the crushing of sugarcane has doubled

कोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात दुपटीने ऊसगाळप झाले आहे. यंदा २२ एप्रिलअखेर तब्बल १००१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ५३५ लाख टन उसाचे गाळप झाले होते. साहजिकच याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावरही झाला आहे. यंदा साखरेचे उत्पादनही साधरणत: दुप्पट म्हणजे १०५ लाख टन झाले आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा ४५ साखर कारखाने जादा सुरू झाले. पश्‍चिम महाराष्ट्राबरोबरच अन्य भागातील साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम जादा प्रमाणात घेतला. गेल्या वर्षी याच कालावधीत १२ हजार ५३९ कोटी रुपयांची शेतकऱ्‍यांना देय होती. यंदा या कालावधीत २१ हजार ३५९ कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्‍यांना देय होती. गेल्या वर्षी या कालावधीत १२ हजार ५३९ कोटी रुपयांपैकी ११ हजार ३१० कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्‍यांना देण्यात आली होती.  या हंगामात १९ हजार ३०२ कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्‍यांना अदा करण्यात आली आहे. या वर्षी गाळप वाढल्याने एफआरपीची रक्कम वाढली असली, तरी यंदाही ९०.२९ टक्के एफआरपी शेतकऱ्‍यांना देण्यात आली आहे. अजूनही २ हजार ७३ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे.

८७ कारखान्यांनी दिली शंभर टक्के एफआरपी साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार १५ एप्रिल अखेर ८७ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी शेतकऱ्‍यांना दिली आहे. तर १०१ कारखान्यांनी अद्यापही पूर्ण एफआरपी दिली नाही. ४८ साखर कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के एफआरपीची रक्कम शेतकऱ्‍यांना अदा केली. ३२ कारखान्यांनी ६० ते ८० टक्के तर २१ साखर कारखान्यांनी ० ते ५९ टक्का रक्कम ऊस उत्पादकांना दिली आहे. एप्रिलच्या मध्यापर्यत १९ कारखान्यांनी आरआरसीअंतर्गत नोटिसा देण्यात आल्या आहेत. 

विभागवार गाळप लाख  टन (२२ एप्रिलअखेर)

  • कोल्हापूर    २३१.०९
  • पुणे    २२७.८
  • सोलापूर    १७५.८६
  • नगर    १६५.८७
  • ओरंगाबाद    ९६.७४
  • नांदेड    ९४.०८
  • अमरावती    ५.८२
  • नागपूर    ४.२२
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com