Agriculture news in marathi This year, the crushing of sugarcane has doubled | Page 2 ||| Agrowon

तुलनेत यंदा दुपटीने गाळप

राजकुमार चौगुले
रविवार, 25 एप्रिल 2021

गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात दुपटीने ऊसगाळप झाले आहे. यंदा २२ एप्रिलअखेर तब्बल १००१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ५३५ लाख टन उसाचे गाळप झाले होते.

कोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात दुपटीने ऊसगाळप झाले आहे. यंदा २२ एप्रिलअखेर तब्बल १००१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ५३५ लाख टन उसाचे गाळप झाले होते. साहजिकच याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावरही झाला आहे. यंदा साखरेचे उत्पादनही साधरणत: दुप्पट म्हणजे १०५ लाख टन झाले आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा ४५ साखर कारखाने जादा सुरू झाले. पश्‍चिम महाराष्ट्राबरोबरच अन्य भागातील साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम जादा प्रमाणात घेतला. गेल्या वर्षी याच कालावधीत १२ हजार ५३९ कोटी रुपयांची शेतकऱ्‍यांना देय होती. यंदा या कालावधीत २१ हजार ३५९ कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्‍यांना देय होती.
गेल्या वर्षी या कालावधीत १२ हजार ५३९ कोटी रुपयांपैकी ११ हजार ३१० कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्‍यांना देण्यात आली होती. 
या हंगामात १९ हजार ३०२ कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्‍यांना अदा करण्यात आली आहे. या वर्षी गाळप वाढल्याने एफआरपीची रक्कम वाढली असली, तरी यंदाही ९०.२९ टक्के एफआरपी शेतकऱ्‍यांना देण्यात आली आहे. अजूनही २ हजार ७३ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे.

८७ कारखान्यांनी दिली शंभर टक्के एफआरपी
साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार १५ एप्रिल अखेर ८७ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी शेतकऱ्‍यांना दिली आहे. तर १०१ कारखान्यांनी अद्यापही पूर्ण एफआरपी दिली नाही. ४८ साखर कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के एफआरपीची रक्कम शेतकऱ्‍यांना अदा केली. ३२ कारखान्यांनी ६० ते ८० टक्के तर २१ साखर कारखान्यांनी ० ते ५९ टक्का रक्कम ऊस उत्पादकांना दिली आहे. एप्रिलच्या मध्यापर्यत १९ कारखान्यांनी आरआरसीअंतर्गत नोटिसा देण्यात आल्या आहेत. 

विभागवार गाळप लाख 
टन (२२ एप्रिलअखेर)

  • कोल्हापूर    २३१.०९
  • पुणे    २२७.८
  • सोलापूर    १७५.८६
  • नगर    १६५.८७
  • ओरंगाबाद    ९६.७४
  • नांदेड    ९४.०८
  • अमरावती    ५.८२
  • नागपूर    ४.२२

इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...
राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने...नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज...
‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या...औरंगाबाद : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील...शेती म्हटली की सर्वत्र कमी जास्त प्रमाणात त्याच...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारीबुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...