नगर जिल्ह्यातील प्रकल्पांत यंदा पन्नास टक्केच पाणीसाठा

नगर जिल्ह्यातील प्रकल्पांत यंदा पन्नास टक्केच पाणीसाठा
नगर जिल्ह्यातील प्रकल्पांत यंदा पन्नास टक्केच पाणीसाठा

नगर : जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यात आजूनही जोरदार पाऊस नाही. मात्र गुरुवारपासून (ता.२५) अकोले तालुक्यातील पश्चिम भागात मुळा, भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरु झाला आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा आता पन्नास टक्क्याच्या जवळ गेला आहे. मुळात ३२ टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यत निम्माच पाणीसाठा उपलब्ध आहे.

गेल्या वर्षभरात दुष्काळाच्या गंभीर झळा सोसल्यानंतर यंदा चांगला पाऊस होईल, अशी आशा होती. मात्र अजूनही आनेक भागात जोराचा पाऊस नाही. दुष्काळाची तीव्रता आणि पाणी, चाराटंचाई कमी झालेली नाही. जोरदारा पाऊस पडत नसल्याने पेरणी केलेली पिके अडचणीत आहेत.

जिल्हाभर पाऊस नसला, तरी अकोले तालुक्यातील पश्चिम आदीवासी भागात पडणाऱ्या पावसावर मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणासह जायकवाडीचे भवितव्य अवलंबून आहे. दरवर्षी या भागात जोराचा पाऊस पडतो. पण यंदा तेथेही फारसा जोरदार पाऊस नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास टक्केच पाणीसाठा झाला आहे.

गुरुवारपासून काही प्रमाणात पावसाला सुरवात झाली आहे. शुक्रवारी (ता.२६) सकाळी सहा वाजता भंडारदऱ्याचा पाणीसाठा ४७ टक्के झाला. मुळात ३२ टक्के पाणीसा झाला आहे. मुळा नदीतून कोतूळजवळ ५ हजार ६३८ क्युसेकने पाणी धरणात येत होते. सकाळी सहा वाजेपर्यत घाटघरमध्ये ९५, रतनवाडीत ९४, पांजरेत ६९, वाकीत ५५, भंडारदरऱ्यात ७७, निळवंडेत १६, आढळा येथे १०, तर अकोल्यात १६ मिलिमिटर पाऊस झाला.

धरण क्षमता (दलघफु)   सध्याचा पाणीसाठा गतवर्षीचा पाणीसाठा (टक्के)
मुळा २६,००० ३२ ५६
भंडारदरा ११,०३२ ५० ८४
निळवंडे ८,३२०   २१ ६५
आढळा १०६०  १५   २०
मांडओहळ  ३९९ २   १९
खैरी ५३३     २   १९
सीना २४००   २५ १०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com