Agriculture news in marathi, Year-round water problem in drought belt in Sangli district released | Agrowon

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील वर्षभराचा पाणीप्रश्‍न सुटला

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

सांगली : जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पाऊस दमदार झाला. यामुळे जिल्ह्यातील १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या तलावात चांगला पाणीसाठा झाला आहे.  यामुळे जिल्ह्यासह दुष्काळी पट्ट्यातील पाणीप्रश्‍न वर्षभर सुटला असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. 

सांगली : जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पाऊस दमदार झाला. यामुळे जिल्ह्यातील १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या तलावात चांगला पाणीसाठा झाला आहे.  यामुळे जिल्ह्यासह दुष्काळी पट्ट्यातील पाणीप्रश्‍न वर्षभर सुटला असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. 

जिल्ह्यात शंभर हेक्‍टरपर्यंत सिंचनक्षमता असणारे ६०८ प्रकल्प आहेत. त्याची पाणी साठवणक्षमता ४९१२१ घनमीटर आहे. ६०८ तलावांत ४४८५० घनमीटर इतका पाणीसाठा झाला. जिल्ह्यात पावसाला उशिरा सुरवात झाली. ऑगस्ट महिन्यात महापूर आला. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. परंतु दुष्काळी पट्ट्यात हा पाऊस झालाच नाही. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता होती. मात्र गेल्या २० ते २५ दिवसांपूर्वी मॉन्सूनोत्तर पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे बळिराजा सुखावला. 

विहिरी, ओढे तुडुंब भरले. असा पाऊस गेली अनेक वर्षे दुष्काळी पट्ट्यात झालाच नाही. वास्तविक पाहता दोन तपांनंतर प्रथम मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात शंभर हेक्टरपर्यंत सिंचनक्षमता असेलेले मध्यम प्रकल्प शंभर आहेत. ताकारी, म्हैसाळ, टेंभू आणि आरफळ या योजनांतून या तलावात पाणी सोडण्यात आले होते. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने दुष्काळी पट्ट्यातील तलावात पाणीसाठा झाला नाही. 

वाळवा आणि शिराळा तालुक्यांतील तलाव शंभर टक्के भरले आहेत. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर आणि तासगाव या तालुक्यांत मॉन्सूनोत्तर मुसळधार पाऊस झाला. यामुळे भूर्गभातील पाणीपातळी वाढली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वच तलाव भरले आहेत. जत आणि आटपाडी या कायम दुष्काळी तालुक्यातील तलावांची संख्या अधिक आहे. सर्वाधिक तलाव जत तालुक्यात आहेत. येथील १३१ तलावांत ६५ टक्के पाणी आहे. आटपाडी तालुक्यातील १३० तलावांत ८५ टक्के पाणी आहे. यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...