देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार व्यक्तींचा मृत्यू 

हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ, वाढते शहरीकरण यामुळे वीज पडण्याचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय त्या घटनेतील मृत्युदर वाढत आहे. भारतात दरवर्षी दोन हजार नागरिकांचा वीज पडल्याने मृत्यू होतो.
thunderstorm
thunderstorm

पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ, वाढते शहरीकरण यामुळे वीज पडण्याचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय त्या घटनेतील मृत्युदर वाढत आहे. भारतात दरवर्षी दोन हजार नागरिकांचा वीज पडल्याने मृत्यू होतो. यामध्ये सर्वाधिक संख्या ही मध्य प्रदेश राज्यात आहे. महाराष्ट्रातही विदर्भ आणि मराठवाड्यात वीज पडून मृत्यूची संख्या अधिक आहे, अशी माहिती भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र विभागाच्या वीज विभागाचे प्रमुख एस. डी. पवार यांनी दिली. 

भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेच्यावतीने आयोजित तीनदिवसीय कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी शनिवारी (ता. १९) भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेतील (आयआयटीएम) वरिष्ठ संशोधक डॉ. सुनील पवार यांनी ‘‘भारतात वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण’’ याविषयावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत हवामान तज्ज्ञ डॉ. ए. के. सहाय यांची प्रमुख उपस्थिती होती. तर भारतीय हवामान विभागातील अधिकारी नीलेश वाघ, ‘आयआयटीएम’चे डॉ. सचिन घुडे, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातील संशोधिका शुभांगी भुते, हवामान तज्ज्ञ डॉ. जी. आर. कुलकर्णी, के. एस. होसाळीकर आदी उपस्थित होते. 

डॉ. पवार म्हणाले, की देशातील हरित आच्छादन कमी झाल्याने होणारे हवामान बदल आणि त्याच्या प्रतिकूल परिणामांबाबत सातत्याने चर्चा केली जाते. मात्र शहरांमध्ये वाढलेल्या इमारती, डोंगरावरील कमी होत असलेली झाडी यामुळे वीजा पडण्याचे प्रमाण वाढत आहे. ढगांतून अत्यंत वेगाने वीज जमिनीकडे जात असल्याने काही वेळांतच होत्याचे नव्हते होते. जगात दरवर्षी वीस हजारांहून अधिक, तर भारतात दरवर्षी दोन हजार नागरिकांचा वीज पडल्याने मृत्यू होतो. यामध्ये सर्वाधिक संख्या ही मध्य प्रदेशमध्ये त्यापाठोपाठ ओडिशा, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात होते. 

महाराष्ट्राबाबत सांगायचे झाल्यास राज्यात मराठवाडा आणि विदर्भात वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसेच दुपारी एक वाजल्यानंतर वीज पडण्यास सुरुवात होऊन, दुपारी चारनंतर याचे प्रमाण सर्वाधिक असते. सामान्यपणे या वेळेत बहुतांश नागरिक घराबाहेर पडतात. पावसात लोक झाडाखाली थांबतात आणि वादळी वाऱ्याबरोबर झाडावर वीज कोसळते. त्यामुळे मृत्यू वाढतात. 

शेतकऱ्यांसाठी दामिनी अॅप महत्त्वाचे  पावसाळ्यात वीज कोठे पडणार आहे, याची माहिती व्हावी यासाठी हवामान विभागाने दामिनी अॅप तयार केले आहे. या अॅपमुळे आपल्या परिसरातील किमान २५ किलोमीटर अंतरात कोठे वीज पडणार आहे, याची माहिती मिळते. याबरोबरच या अॅपमध्ये गावाचे नाव टाकल्यास त्या गावामध्ये वीज पडणार आहे की नाही याचीही माहिती मिळू शकते.  ‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार... 

  • २०१९-२०२० मधील मृत्यूंची संख्या ः १७७१ 
  • झाडाखाली उभे असलेल्या बळींचे प्रमाण ः ७१ टक्के 
  • थेट वीज पडून मृत्युमुखी पडलेले ः २५ टक्के 
  • अप्रत्यक्षपणे बळी ठरलेले ः ४ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com